Mumbai News : गिरगावमध्ये देहव्यापार, मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्रीला रंगेहाथ पकडलं; मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

मुंबई पोलिसांनी गिरगावमधील एका हॉटेलमध्ये कथितपणे सुरू असलेल्या देहव्यापार रॅकेटचा भांडाफोड केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
प्रतिकात्मक फोटो

Mumbai News : मुंबई पोलिसांनी गिरगावमधील एका हॉटेलमध्ये कथितपणे सुरू असलेल्या देहव्यापार रॅकेटचा भांडाफोड केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन अभिनेत्रींना रेस्क्यू केलं आहे. यामध्ये मराठी चित्रपटातील मुख्य अभिनेत्रीचं नाव असून दुसऱ्या अभिनेत्रीने बंगाली आणि बॉलिवूड चित्रपटात कॅमियोची भूमिका साकारली आहे. या ऑपरेशनदरम्यान एका दलालाही रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. जो कथितपणे सेलिब्रिटींसह काम करणारा मेकअप आर्टिस्ट आहे. मुंबई पोलिसांनी यासंदर्भात माहिती प्रसिद्ध केली आहे. 

अवैध देह व्यापाराचा पर्दाफाश...

यापूर्वीही याच वर्षी जानेवारी महिन्यात अनैतिक मानवी तस्कर विरोधी विभागाच्या टीमने नवी मुंबईत तुर्भे नाका भागातील लॉजमध्ये सुरू असलेल्या अवैध देह व्यापाराचा पर्दाफाश केला होता. यावेळी टीमने घटनास्थळावरुन सात महिलांची सुटका केली होती. एक टीप मिळाल्यानंतर झालेल्या कारवाईदरम्यान पोलिसांनी या रॅकेटशी संबंधित तीन आरोपींना अटक केली होती.

Advertisement

तुर्भे नाकाजवळील एका लॉजमध्ये ग्राहकांकडून मोठी रक्कम वसूल करीत महिलांकडून देह व्यापार करविण्यात येत होता. पोलिसांनी याची पुष्टी करण्यासाठी योजनाबद्ध पद्धतीने कारवाई केली होती. पोलिसांनी एका खोट्या ग्राहकाला लॉजवर पाठवलं आणि अवैध कृत्यांची पुष्टी होताच टीमने छापेमारी केली. छापेमारीदरम्यान पोलिसांना लॉजच्या खोलीत सात महिला दिसल्या, ज्यांना देहव्यापारासाठी ठेवण्यात आलं होतं. 

नक्की वाचा - Siya Goyal News : केतन वाचला असता तर... सीयाने आखला होता प्लान B; चेतनसोबत लग्नाचीही होती तयारी

पोलिसांच्या तपासानुसार, आरोपी एकमेकांशी संगनमत करून महिलांच्या राहण्याची सोय करत असत आणि त्यांना ग्राहकांसमोर सादर करून त्यांच्या पसंतीनुसार सौदा करीत असत. वेश्याव्यवसायातून मिळालेली रक्कम ते आपापसात वाटून घेत होते. पोलिसांनी बनावट ग्राहकांकडून गोळा केलेली रक्कमही जप्त केली आहे.