
Nagpur Violence : गेल्या 17 मार्च रोजी सायंकाळी नागपुरात महाल आणि हंसापुरी भागात झालेल्या हिंसाचार झालेल्या घटनेतील आरोप असणाऱ्या फहिमच्या घरावर बुलडोझर चालवणार असल्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. यशोधरानगरच्या संजय बाग कॉलनीत राहणारा फहीम खान याने घर बांधताना मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम केल्याने मनपा प्रशासनाकडून आता नोटीस बजावण्यात आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
फहिम खान याने घराजवळ तब्बल सुमारे 900 चौरस फुटाचे अनधिकृत बांधकाम केल्याने महानगरपालिकेने नोटीस बजावली असून बुलडोझर कारवाई होणार असल्याचं सांगितलं जात आहे. शहरात लोकांच्या धार्मिक भावना भडकवून हिंसाचार घडवणे, त्यामुळे फहिम खानवर देशद्रोहाचा गुन्हा लावण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना अलीकडेच जिथे आवश्यक असेल तिथे बुलडोझर चालेल असं म्हटलं होतं. त्यामुळे फहिम खानच्या घरावर बुलडोझर चालवणार असल्याची दाट शक्यता आहे.
नक्की वाचा - kunal kamra : 'गद्दार नजर वो आए...', कॉमेडियन कुणाल कामराचं एकनाथ शिंदेंवर गाणं, भडकलेल्या शिवसैनिकांकडून तोडफोड
नागपूर हिंसाचारात एकाचा बळी...
नागपूरच्या हिंसाचारात गंभीर दुखापत झालेल्या व्यक्तीचं काल शनिवारी निधन झालं. सोमवारी रात्री प्रवासाला निघालेले इरफान अन्सारी नागपूरच्या हिंसाचारात सापडून गंभीर जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. काल त्यांचे रुग्णालयात निधन झाले. या घटनेमुळे त्या परिसरात तणावाचे वातावरण होते. काल रात्री पोलीस बंदोबस्तात ताजनगर येथील कब्रस्तानात सुपुर्द ए खाक करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world