जाहिरात

Nanded News: लोक बघत होते, व्हिडीओ काढत होते, 'तो' तिला पळवून नेत होता, अंगावर काटा आणणारा थरार

त्यावेळी त्या दोघांमध्ये वाद झाला. तिने त्याच्या बरोबर जाण्यास नकार दिला. त्याचा राग त्या तरुणाला आला.

Nanded News: लोक बघत होते, व्हिडीओ काढत होते, 'तो' तिला पळवून नेत होता, अंगावर काटा आणणारा थरार
नांदेड:

एक तरुणी रेल्वे स्थानकाबाहेर उभी होती. तिथे एक तरुण आला. तिच्या बरोबर बोलू लागला. त्यानंतर अचानक तो तिला आढायला लागला. ती तरुणी त्याच्या सोबत जाण्यास तयार नव्हती. पण तो ऐकण्याच्या तयारीत नव्हता. तरी हो तिला ओढत होता. अजूनबाजूला गर्दी होती. वर्दळ होती. लोकं हे सर्व पाहात होते. ती ओरडत होती. पण तिच्या मदतीला कुणीच धावलं नाही. उलट त्याचा व्हिडीओ काढण्याच अनेक जण गुंग होते. तो तिला ओढतच राहीला. ओढत ओढत तो तिला एका दुचाकी जवळ घेवून गेला. तिला त्यावर बसवण्याचा तो प्रयत्न करत होता. पण ती ऐकत नव्हती. शेवटी त्याने तिला उचलले आणी गाडीवर टाकले. त्याच्या सहकाऱ्याने गाडी सुरू केली आणि ते तिथून सर्वां समोर फूर्रर्र झाला. ती ओरडत राहील. मदतीसाठी हाक मारत राहील. पण तिला मदत काही मिळाली नाही. 

ही घटना घडली आहे नांदेडमध्ये. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. नांदेड शहरात बुधवारी सायंकाळी 6 च्या सुमारास ही घटना घडली.  दोन तरुणांनी एका तरुणीचे चक्क सर्वां देखत अपहरण केले. आजूबाजूला अनेक लोक असतानाही सर्वजण हा तमाशा चुपचाप फक्त बघत राहिले. काहींनी मात्र या घटनेचा व्हिडीओ तयार केला. त्यानंतर हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला. या संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. खबऱ्यांच्या मदतीने पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला.  

नक्की वाचा - Malegaon Bomb Blast: 'माझ्याच देशाने मला दहशतवादी बनवलं', निर्दोष सुटकेनंतर साध्वी प्रज्ञाला अश्रू अनावर

पाठलाग करून पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतलं आहे. शिवाय त्यामुलीची सुटका ही करण्यात आली आहे. तर दुसरा आरोपी हा फरार झाला आहे. नांदेडचे पोलिस अधिक्षक अविनाश कुमार यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. ज्या तरुणीला पळून नेण्याचा प्रयत्न झाली ती 21 वर्षांची आहे. ती नांदेड  रेल्वे स्थानका लगतच राहाते. भीक मागून ती आपली उपजिवीका करते. ज्या तरुणाने तिला पळून नेण्याचा प्रयत्न केला तो तिच्या परिचयाचा होता. तो तिला त्या ठिकाणी भेटण्यासाठी आला होता. शिवाय तो तिला आपल्या सोबत चल असा आग्रह करत होता, असं अविनाश कुमार यांनी सांगितला. 

Malegaon Bomb Blast: मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपींची सुटका कशी झाली? कोर्टाने निकालात काय म्हटलं?

त्यावेळी त्या दोघांमध्ये वाद झाला. तिने त्याच्या बरोबर जाण्यास नकार दिला. त्याचा राग त्या तरुणाला आला. त्यानंतर त्याने थेट तिला उचलून पळवून नेले असं त्यांनी सांगितलं. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत मुलीची सुटका केली आहे. तिच्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक आरोपी फरार आहे. तो अल्पवयीन असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. मात्र सर्वांसमोर झालेल्या या प्रकाराने सर्वच जण हादरले आहेत.   

Listen to the latest songs, only on JioSaavn.com