Dharmabad Municiple Election News: बारामती, अंबरनाथ, फलटणसह राज्यातील 23 नगरपरिषदा, नगरपंचायतींमध्ये आज मतदान होत आहे. राज्यभरात मतदान शांततेत सुरु असतानाच नांंदेडमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नांदेडच्या धर्माबाद येथे मतदारांना डांबून ठेवल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. मतदान करु नका असे सांगत हजारो मतदारांना एका मंगल कार्यालयामध्ये डांबल्याच्या आरोपाने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
हजारो मतदारांना मंगलकार्यात कोंडलं
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज नांदडमधील धर्माबाद इथ मतदान होत आहे. मतदान प्रक्रिया सुरू असताना शहरातील इराणी मंगल कार्यालय इथ मतदारांना बोलवून मतदान करू नका असे भाजपने सांगितल्याचा आरोप होत आहे. घटनास्थळी तत्काळ पोलिस दाखल झाले पण तिथे कोणताही वादविवाद होताना दिसून आला नाही. जे मतदान भाजपला होणार नाही अशा मतदारांना प्रलोभन दाखवून मतदान करू नका अशी विनंती भाजप करत होते अशी चर्चा आहे.
Pune News: तीन वर्गमित्र, 3 पक्ष अन् 1 प्रभाग..! पुण्यातील जिवलग दोस्तांची राज्यात चर्चा; विषय काय?
पैसे देतो असे सांगत या मतदारांना बोलावून घेतले. मंगल कार्यालयात सर्वांना तुम्हाला चार वाजेपर्यंत पैसे देतो असे सांगत थांबवून ठेवले. मात्र सकाळपासून या मतदारांना थांबवून ठेवण्यात आले, ज्यावेळी माध्यमांना याबाबतची माहिती मिळाली, तेव्हा सर्वजण पैसे न देता पळून गेले, असा आरोप या मतदारांनी केला आहे. या धक्कादायक प्रकाराने नांदेड जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
अंबरनाथमध्येही गोंधळ...
दुसरीकडे, अंबरनाथ येथील कोहोजगाव परिसरातील कृष्णा मॅरेज हॉलमध्ये मतदानाचा आधी 200 हून जास्त महिलांना थांबवण्यात आले होते. काँग्रेस आणि भाजपाचा कार्यकर्त्यांनी या महिलांना बोगस मतदानासाठी आणल्या गेल्या आहेत असा आरोप करीत गोंधळ घातला. यानंतर अंबरनाथ पोलिसांनी त्या महिलांना ताब्यात घेतले. पुढील चौकशी सुरू आहे.
मात्र यावरून शिवसेना ,भाजप, आणि काँग्रेसमध्ये चांगलीच जिंकली आहे. एकमेकांविरोधात गंभीर स्वरूपाचे आरोप करीत आहे. भाजपाचे नेते गुलाबराव करंजुले यांनी बोगस मतदानासाठी या महिला मुंब्रा, भिवंडी ,मालेगाव येथून आणण्याचा आरोप केला आहे. यांना आणणाऱ्यांवर पोस्ट कारवाई झाली पाहिजे नाहीतर आंदोलन करू अशा इशारा दिला
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world