जाहिरात

Nandurbar News : कलिंगडनंतर आता चिकनची भीती? चिकन, अंडी आणि बिर्याणी विक्रीवर पूर्णपणे बंदी 

सुट्ट्यांच्या दिवसात तुम्ही चिकन टिक्का, चिकन बिर्याणी, चिकन अंगारा, चिकन चिली, लॉलीपॉप यासारख्या चिकनच्या पदार्थांवर ताव मारत असाल तर थोडं थांबा.

Nandurbar News : कलिंगडनंतर आता चिकनची भीती? चिकन, अंडी आणि बिर्याणी विक्रीवर पूर्णपणे बंदी 

Nandurbar News : देशभरात बर्ड फ्लूच्या वाढत्या घटनांमुळे प्रशासन अलर्ट मोडवर आहे. महाराष्ट्रासह देशातील किमान दहा राज्यांमध्ये बर्ड फ्लूची प्रकरणं समोर आली असताना, आता नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरात तिसऱ्यांदा बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याने प्रशासनाने कडक पावलं उचलली आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून नवापूर शहरात चिकन, अंडी आणि बिर्याणी विक्रीवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. 

अनेक ठिकाणी कोंबड्या नष्ट करण्याचं काम....

सुट्ट्यांच्या दिवसात तुम्ही चिकन टिक्का, चिकन बिर्याणी, चिकन अंगारा, चिकन चिली, लॉलीपॉप यासारख्या चिकनच्या पदार्थांवर ताव मारत असाल तर थोडं थांबा. देशात बर्ड फ्लूचा धोका दिवसेंदिवस गंभीर बनत चाललाय. केंद्र सरकारच्या माहितीनुसार, 2025 आणि 2026 मध्ये महाराष्ट्रासह कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेश, बिहार, ओडिशा, उत्तरप्रदेश, झारखंड आणि छत्तीसगडमध्ये बर्ड फ्लूची प्रकरणं आढळून आली आहेत. 
बर्ड फ्लूमुळे हजारो पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. अनेक ठिकाणी कोंबड्या नष्ट करण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील नंदूरबार जिल्ह्यातल्या नवापूर शहरातही तिसऱ्यांदा बर्ड फ्लूचे रुग्ण आढळल्यानं चांगलीच खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बाधित क्षेत्रातील एक किलोमीटर परिसरात पक्षी, अंडी आणि पोल्ट्री खाद्य नष्ट करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे. 

नक्की वाचा - Nasrapur Case : 'तुमची केस माहिती आहे का?' नसरापूर घटनेतील नराधम आरोपीचा कोर्टात संतापजनक दावा

चिकन आणि अंडी विक्रीवर निर्बंध

बर्ड फ्लूचा संसर्ग वाढू नये, यासाठी नवापूर नगरपरिषद प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून शहरात चिकन, अंडी आणि बिर्याणी विक्रीवर पूर्णपणे बंदी घातली आहे. नगरपालिका हद्दीत असलेल्या सुमारे 20 ते 25 पोल्ट्री फार्मवर प्रशासनानं लक्ष केंद्रीत केलं आहे. पोलीस प्रशासनाने नगरपालिकेला लेखी कळवल्यानंतर मच्छी मार्केट आणि शहरातील चिकन विक्रीची दुकानं बंद करण्यात आली आहेत. बंदीचा आदेश पाळला नाही तर कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. देशभरातील अनेक राज्यांमध्ये अशीच परिस्थिती आहे. कर्नाटक, तामिळनाडू, केरळ आणि आंध्रप्रदेशमध्ये बर्ड फ्लूमुळे हजारो पक्ष्यांची कत्तल करण्यात आली आहे. अनेक शहरांमध्ये चिकन आणि अंडी विक्रीवर निर्बंध लावण्यात आले आहेत. आता नवापूरमध्ये ही बंदी नेमकी किती दिवस राहणार, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे व्यावसायिक चिंतेत आहेत. दरम्यान, तालुका प्रशासनाकडून नागरिकांना घाबरून न जाता, दिलेल्या सूचना पाळा, अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन करण्यात आलं आहे.

देशभर बर्ड फ्लूचा धोका वाढत असताना नवापूरमध्ये प्रशासनाची कठोर पावलं आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. असं असलं तरी चिकन विक्रीवरील बंदी स्थानिक व्यावसायिकांसाठी मोठं आव्हान ठरतेय. आता परिस्थिती कधी नियंत्रणात येते, याकडे चिकन विक्रेत्यांसह खवय्यांचंही लक्ष लागलं आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com