जाहिरात

Nagpur News: नागपूर शहरात ऑपरेशन थंडर! दीड वर्षात 730 जण अटकेत; प्रकरण काय?

अंमली पदार्थ विरोधी पथकाने गेल्या एक वर्षात सुमारे 8 कोटी रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त केल्याची माहिती पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल यांनी दिली.

Nagpur News: नागपूर शहरात ऑपरेशन थंडर! दीड वर्षात 730 जण अटकेत; प्रकरण काय?

नागपूर: गेल्या दीड वर्षांत नागपूर शहरात आठ कोटी रुपयांच्या अंमली पदार्थांची जप्ती करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांनी दिली. ‘ऑपरेशन थंडर' या विशेष मोहिमेत 730 जणांना अटक करण्यात आली असून 540 प्रकरणांमध्ये अंमली पदार्थांची विक्री आणि साठवणूक संबंधित गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

नागपूर शहर ड्रग फ्री करण्याच्या उद्देशाने 20 ते 26 जूनदरम्यान ‘अंमली पदार्थ विरोधी जनजागृती सप्ताह' साजरा केला जाणार आहे. पोलीस आयुक्तालयाच्या पुढाकाराने हा सप्ताह राबविण्यात येणार असून, एकत्र येऊया, नशामुक्त समाज घडवूया'या घोषवाक्याखाली शहरातील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच विविध खेळांचे खेळाडू यांच्या सहभागातून जनजागृती होणार आहे. या अभियानादरम्यान, अंमली पदार्थ विरोधी पथकाने गेल्या एक वर्षात सुमारे 8 कोटी रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त केल्याची माहिती पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल यांनी दिली.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )


1. एमडी (मेथॅम्पेटामीन):
   एकूण 94 प्रकरणांत  6कोटी 81 लाख रुपये किमतीची एमडी पावडर* जप्त.
   एकूण 6 किलो एमडी जप्त; 186 आरोपींना अटक.

2. गांजा:
   100 प्रकरणांत 1 कोटी 66 लाख रुपयांचा गांजा जप्त.
   एकूण 132 आरोपींवर अटक.

3. डोडा:
   एका प्रकरणात 128 किलो डोडा जप्त, किमत 10 लाख 28 हजार रुपये

4. अफू (अफीम):
   एका प्रकरणात 548 ग्रॅम अफीम जप्त, किमत 6 लाख 18 हजार रुपये
   एक आरोपी अटकेत.

5. चरस:
   70 ग्रॅम चरस, किमान किमत 70 लाख 75 हजार रुपये जप्त.

( नक्की वाचा : Sonam Raghuvanshi : सर्वांसमोर भैय्या, पाठीमागे सैया! सोनम आणि राजचं अफेयर कसं सुरु झालं? )

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com