नाशिकच्या पंचवटीतील बिडी कामगारनगरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे भररस्त्यात एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. काळू भोये असं या तरुणाचं नाव आहे. या हत्येनंतर कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. पोलीस ठाण्याबाहेर कुटुंबीयांचे नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांनी मोठं आंदोलन पुकारलं आहे.
नक्की वाचा - उद्यापर्यंत शपथविधी झाला नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागेल? कायदा काय सांगतो?
धक्कादायक बाब म्हणजे या तरुणाची हत्या करण्यात आरोपीचं संपूर्ण कुटुंब सामील झाल्याची माहिती आहे. या आरोपींवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी मृत तरुणाच्या कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरुन काळू भोये या तरुणाचं मित्रासोबत वाद झाला होता.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या भांडणातून आरोपीच्या कुटुंबीयांनी काळूवर हल्ला केला होता. हत्या करताना आरोपींनी काळूच्या डोळ्यांमध्ये मिरचीची पूड घातली होती. आणि तीक्ष्ण हत्याराने त्याच्यावर हल्ला केला होता. बिडी कामगार नगरच्या भरचौकात येऊन रात्री साधारण साडे नऊच्या सुमारास काळू भोये याची हत्या करण्यात आली होती. भोये कुटुंबीयांनी आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतला असून परिसरात आंदोलन पुकारलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world