जाहिरात

Nashik News: मद्यधुंद 4 तरुणींचा जोरदार राडा! दगडफेक, शिवीगाळ करत परिसर हादरवून सोडला, Video Viral

ज्यावेळी त्या तिच्या घरी धडकल्या त्यावेळी त्या मद्यधुंद अवस्थेत होत्या. त्या इमारतीत येताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहेत.

Nashik News: मद्यधुंद 4  तरुणींचा जोरदार राडा! दगडफेक, शिवीगाळ करत परिसर हादरवून सोडला, Video Viral
नाशिक:

वैभव घुगे 

नाशिकमध्ये सध्या एका व्हिडीओची जोरदार चर्चा सुरू आहे. हा व्हिडीओ ही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आहे चार मद्यधुंद तरुणींनी केलेल्या राड्याचा. हा राडाही शुल्लक कारणावरून झाला आहे. या तरुणींनी एका सोसायटीमध्ये राहाणाऱ्या आपल्याच कॉलेजच्या तरुणीच्या घरावर हल्ला केला. दगडफेक केली. शिवाय शिवीगाळ केली. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी त्यांचा व्हिडीओ काढला. या सर्व मुली अल्पवयीन असल्याचंही समोर येत आहे. त्यांनी मद्य सेवन केल्याचं ही उघड झालं आहे. या प्रकारानंतर ज्या मुलीच्या घरावर हल्ला झाल्या तिच्या कुटुंबीयांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. शिवाय संबंधीत मुलींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

नाशिकच्या सातपूर परिसरात ही घटना घडली. रात्रीच्या सुमारास चार मद्यधुंद तरुणी या ठिकाणी आल्या. त्यांनी एका तरुणीच्या घरावर दगडफेक केली. ही तरुणी त्यांच्याच कॉलेजची आहे. ती बारावीत शिकते.  माझा मित्र तुझ्यामुळे जेलमध्ये गेला असं त्या वारंवार बोलत होत्या. शिवाय त्या मुलीला शिव्याही देत होत्या. ज्यामुलीच्या घरावर हल्ला झाला त्या मुलीची अन्सारी नावाच्या मुला सोबत मैत्री होती. मात्र ही मैत्री पुढे तुटली. त्यानंतर या अन्सारीने आपल्या दुसऱ्या मैत्रीणीच्या मदतीने तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र ते तिला आवडलं नाही. 

नक्की वाचा - Teeth Cavity: दातातील किडीचा 1 मिनिटात गेम ओव्हर! हे आहेत 4 प्रभावी घरगुती उपाय

तिने कॉलेजमधल्या आपल्या दुसऱ्या मित्रांना अन्सारीबाबत तक्रार केली. तो वारंवार आपल्याला संपर्क करत असल्याचं ही तिने त्यांना सांगितलं. त्या तरुणीच्या मित्रांनी त्यानंतर अन्सारीला याबाबत जाब विचारला. त्यातून राडा झाला. गोंधळ घातला गेला. त्या तरुणीच्या मित्रांची आणि अन्सारी यांच्यात हाणामारी झाली. या प्रकरणी पोलीस तक्रार झाली. पोलीसांनी अन्सारीला जेलमध्ये टाकले. याचा राग अन्सारीच्या मैत्रिणींनी मनात ठेवला. त्यातून त्यांनी त्या मुलीलाही मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे. ऐवढेच नाही तर अन्सारीच्या त्या चार मैत्रिणी त्या मुलीच्या घरी ही धडकल्या. 

नक्की वाचा - Aaradhya Bachchan: अभिषेक-ऐश्वर्याची लेक आराध्याची शाळेची फी किती? महिन्याचा आकडा ऐकून थक्क व्हाल

 ज्यावेळी त्या तिच्या घरी धडकल्या त्यावेळी त्या मद्यधुंद अवस्थेत होत्या. त्या इमारतीत येताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहेत. त्यानंतर त्यांनी त्या मुलीच्या घरावर दगडफेक केली. शिवाय मोठ्या प्रमाणात शिवीगाळ ही केली. त्याचा व्हिडीओ तिथल्या एका व्यक्तीने शुट केला. तोच व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या घटनेनंतर संबंधीत मुलीचे कुटुंबीय घाबरून गेले आहेत. त्यांनी तातडीने सातपूर पोलीस ठाणे गाठले. शिवाय त्या मुलीं विरोधात ही तक्रार दाखल केली. या मुलींवर कारवाई झाली पाहीजे अशी मागणी त्यांनी केली आहे. तर अन्सारी या गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचा आरोप तरुणीच्या वडीलांनी केला आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com