जाहिरात

Belapur Crime: भरचौकात हत्येचा थरार! डोक्यात दगड घालून तरुणाला संपवलं

वादातून संतप्त झालेल्या अभिषेकने झोपेत असलेल्या प्रकाश यांच्या डोक्यावर मोठ्या दगडाने सपासप वार करत त्यांचा जागीच मृत्यू घडवून आणला.

Belapur Crime: भरचौकात हत्येचा थरार! डोक्यात दगड घालून तरुणाला संपवलं

राहुल कांबळे, बेलापूर: सीबीडी बेलापूरमधील शहाबाज बेलापूर ब्रिजच्या खालील फुटपाथवर झोपलेल्या एका इसमाची रविवारी पहाटेच्या सुमारास दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. मृत व्यक्तीची ओळख प्रकाश नागोराव लोखंडे (वय अंदाजे 60 वर्षे) अशी झाली आहे. तर या हत्येप्रकरणी आरोपी असलेला अभिषेक सिंग उर्फ अभिषेक पाल (वय 35 वर्षे, रा. एपीएमसी मार्केट, नवी मुंबई, मूळ गाव प्रयागराज, उत्तर प्रदेश) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

प्राथमिक माहितीनुसार, आज दिनांक 8 जून रोजी पहाटे सुमारे 3.45 वाजता, प्रकाश लोखंडे हे नेहमीप्रमाणे ब्रिजखाली फुटपाथवर झोपलेले असताना, आरोपी अभिषेक पाल याच्याशी कोणत्यातरी कारणावरून वाद झाला. त्या वादातून संतप्त झालेल्या अभिषेकने झोपेत असलेल्या प्रकाश यांच्या डोक्यावर मोठ्या दगडाने सपासप वार करत त्यांचा जागीच मृत्यू घडवून आणला.

ही धक्कादायक घटना पाहून परिसरातील नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आरोपीस पकडून बेदम मारहाण सुरू केली. जमाव त्याला ठार मारण्याच्या तयारीत असताना, सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक योगेश जाधव, बीट मार्शल पोलीस हवालदार देवकाते व पोलीस हवालदार तरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत हस्तक्षेप केला. त्यांनी अनावर झालेल्या जमावाला शांत करत आरोपीला त्यांच्या तावडीतून बाहेर काढले आणि त्याची सुरक्षा सुनिश्चित केली.

नक्की वाचा - Godavari River : तेलंगणाच्या सीमेवरील धरणात सहा मुलं बुडाली, नदीच्या किनाऱ्यावर कुटुंबीयांचा आक्रोश

मारहाणीमुळे आरोपी अभिषेक पाल गंभीर जखमी झाला असून, त्याला तत्काळ वाशीतील पालिका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी वेळेवर केलेल्या कार्यवाहीमुळे पुढील संभाव्य अनर्थ टळला असून, पोलीस प्रशासनाच्या तातडीच्या प्रतिसादाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com