
राहुल कांबळे, प्रतिनिधी
Navi Mumbai Crime News : दिवाळीच्या (Diwali) पार्श्वभूमीवर नवी मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकाने (ANC) अमली पदार्थ तस्करांविरोधात मोठी मोहीम हाती घेतली आहे. याचाच एक भाग म्हणून पथकाने कळंबोली येथील स्टील मार्केट परिसरात धडक कारवाई करत 15 लाख 83 हजार रुपये (रुपये 15.83 लाख) किमतीचे हेरॉईन (Heroin) आणि गांजा (Ganja) असा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईत गोवंडी, मुंबई येथील अनेक गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड असलेला गुन्हेगार राजन बाळा राठोड (वय 33) याला अटक करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
अमली पदार्थ विरोधी (ANC) पथकाला कळंबोली स्टील मार्केट परिसरात राजन राठोड नावाचा इसम अमली पदार्थांची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे, 20 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 2.50 वाजता ANC पथकाने तात्काळ सापळा रचून छापा टाकला.
या छाप्यात आरोपी राजन राठोड पोलिसांना दिसून आला. त्याची झडती घेतल्यावर त्याच्याकडून एकूण 15 लाख 83 हजार रुपये (रुपये 15.83 लाख) किमतीचा अमली पदार्थ जप्त करण्यात आला, ज्यात खालील साहित्याचा समावेश आहे:
अमली पदार्थ जप्त केल्यानंतर आरोपी राजन राठोड याला ताब्यात घेऊन कळंबोली पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायदा (NDPS Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढील तपास सुरू आहे.
( नक्की वाचा : Punjab Ex-DGP: ''डॅड आणि पत्नीला एकत्र बाथरूममध्ये पकडलं...": मृत्यूआधी माजी DGP च्या मुलाचा धक्कादायक Video )
वॉन्टेड आरोपीचा गुन्हेगारी इतिहास
अटक करण्यात आलेला आरोपी राजन बाळा राठोड हा गोवंडी (Govandi), मुंबई येथे राहणारा असून, तो नवी मुंबई परिसरात अमली पदार्थांचा पुरवठा करत होता. तपासात असे उघड झाले आहे की, आरोपी राजन राठोड हा अमली पदार्थ विक्रीसह अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये सातत्याने गुंतलेला आहे. त्याच्यावर यापूर्वी NDPS Act आणि भारतीय दंड संहितेच्या (IPC) विविध कलमांखाली एकूण 8 गंभीर गुन्हे विविध पोलीस ठाण्यांमध्ये नोंद आहेत. नवी मुंबई परिसरात तो अनेक दिवसांपासून वॉन्टेड (Wanted) होता.
अंमली पदार्थ साखळीला मोठा धक्का
अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई पार पडली. या कारवाईमुळे नवी मुंबई परिसरातील अमली पदार्थांची पुरवठा साखळी (Drug Supply Chain) तोडण्यात पथकाला मोठे यश मिळाले असून, अमली पदार्थ तस्करांना मोठा धक्का बसला आहे. सणासुदीच्या काळात अमली पदार्थ विरोधी मोहीम तीव्र केली असून, यापुढेही अशा कारवाया सुरू राहतील, असे या पथकातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world