Akola News : एका भावाने दुसऱ्या भावावर केला चाकू हल्ला, नंतर घडली सर्वात भयंकर घटना, धक्कादायक कारण आलं समोर

अकोला शहरातील अकोट फाईल पोलीस स्टेशन हद्दीतील बापू नगर येथे धुलीवंदनच्या दुसऱ्या दिवशी एक भयंकर घटना घडली.

जाहिरात
Read Time: 2 mins
Akola Crime News Today

योगेश शिरसाट, प्रतिनिधी 

Akola Crime News : अकोला शहरातील अकोट फाईल पोलीस स्टेशन हद्दीतील बापू नगर येथे धुलीवंदनच्या दुसऱ्या दिवशी एक भयंकर घटना घडली.घर नावावर करण्याच्या वादातून एका भावाने दुसऱ्या भावाची निर्घृण हत्या केली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,रितीक अनिल बिहुणे या व्यक्तीने त्याचा चुलत भाऊ विनीत विजय बिहुणेवर चाकूने वार कले. त्यानंतर विनीत गंभीर जखमी झाला.त्यानंतर त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.परंतु, त्याचा उपचारादरम्यान दुर्देवी मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी रितीकला अटक केली आहे.

फिर्यादी भारती हिरालाल धमेरीया यांनी दिलेल्या जबाबानुसार,आरोपी दारूच्या नशेत नेहमीच विनीतला घर हस्तांतरित करण्यासाठी धमकावत असे.सायंकाळी सहाच्या सुमारास होळीच्या रंगात सुरू असलेल्या कार्यक्रमादरम्यान आरोपीने वाद घालत गोंधळ घातला. त्यानंतर दोघांमध्ये तीव्र भांडण झाले आणि आरोपीने विनीतच्या डाव्या छातीवर चाकूने वार केला.

घटनास्थळावरून आरोपी फरार झाला होता, पण नंतर..

त्यानंतर विनीतला गंभीर जखमी अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी अकोट फाईल पोलीसांनी कलम 103 (1),3(5) बीएनएस अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.घटना घडल्यानंतर आरोपी तत्काळ फरार झाला होता. शेजारी राहणारे भारत शुक्लवारे व प्रीती शुक्लवारे यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. 

नक्की वाचा >> Ashok Hande Attack: तुला सोडणार नाही... मराठी बाणाचे निर्माते अशोक हांडेंवर मुंबईत हल्ला; नेमकं काय घडलं?

त्यानंतर अकोल्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शेख रहीम यांच्या पथकाने तांत्रिक व बौद्धिक कौशल्याचा वापर करून आरोपीचा शोध घेतला. आरोपी भोपालला पळून जाण्याच्या तयारीत होता. तो अकोला रेल्वे स्थानक परिसरात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला आणि अवघ्या दोन तासांत त्याला ताब्यात घेतले. या कारवाईत एएसआय अनिस पठाण व इतर कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. सध्या आरोपीवर अटकेची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्धन खंडेराव करीत आहेत. 

Advertisement