जाहिरात

नकारात्मक विचारांत 13 वर्षांच्या मुलगी अडकली, सुसाइडसाठी धरणावर पोहोचली अन्...पालघरच्या घटनेने पालकवर्ग सतर्क

Palghar News: पालघर जिल्ह्यातील सफाळे येथील झांजरोळी धरणावर 13 वर्षीय मुलगी आत्महत्येसाठी पोहोचली होती, या घटनेमुळे पालकवर्गामध्ये खळबळ उडाली आहे.

नकारात्मक विचारांत 13 वर्षांच्या मुलगी अडकली, सुसाइडसाठी धरणावर पोहोचली अन्...पालघरच्या घटनेने पालकवर्ग सतर्क
"Palghar News: 13 वर्षीय मुलगी सुसाइड करण्यासाठी पोहोचली पालघरच्या धरणावर अन्..."
Canva And NDTV Marathi

- मनोज सातवी, प्रतिनिधी

Palghar News: नकारात्मक विचारांच्या आहारी जाऊन टोकाचे पाऊल उचलणाऱ्या एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला सुरक्षित वाचवण्यात सफाळे पोलिसांना यश आले आहे. पोलिसांच्या समयसूचकतेमुळे झांजरोळी धरणाच्या काठी एक मोठा अनर्थ टळला असून सर्वत्र पोलिसांचे कौतुक होत आहे.

पालघरमधील 13 वर्षीय मुलगी नकारात्मक विचारांमध्ये अडकली अन्...

सफाळे जवळील झांजरोळी गावातील एक 13 वर्षीय मुलगी अचानक घरातून निघून गेल्याची घटना घडली. ती मुलगी घरातून बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच कुटुंबीयांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ शोधमोहीम हाती घेतली. ही मुलगी नकारात्मक मानसिकतेतून काही टोकाचे पाऊल उचलण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली.  

धरण परिसरात शोधमोहीम

तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी गावापासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या झांजरोळी धरण परिसरात शोध सुरू केला. शोध सुरू असतानाच ही मुलगी धरणाच्या काठावर आत्महत्येच्या तयारीत असताना पोलिसांना दिसली. पोलिसांनी अतिशय कौशल्याने तिला ताब्यात घेतले. सुदैवाने तिला कोणतीही शारीरिक इजा झाली नव्हती.

(नक्की वाचा: Wardha News: पत्नीने 50 रुपये उधार दिले, पतीने रागाच्या भरात हत्याच केली; वर्धा प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय)

समुपदेशन आणि पालकांच्या स्वाधीन

मुलीला सुरक्षितस्थळी आणल्यानंतर पोलिसांनी तिची विचारपूस केली. ती मानसिक तणावात आणि नकारात्मक विचारांच्या गर्तेत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तज्ज्ञांच्या मदतीने तिचे समुपदेशन केले. तिचे मन वळवून तिला जीवनाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. त्यानंतर तिला सुखरूप तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.

(नक्की वाचा: Pune News: पुणे पोलीस दलात मोठी खळबळ! पॉक्सोची भीती दाखवून महिला प्राचार्याकडून 7 लाख रुपये मागितले, 3 खंडणीखोर पोलिसांना दणका)

पालघर पोलिसांचे पालकांना आवाहन

या घटनेच्या पार्श्वभूमीवर पालघर पोलिसांनी पालकांसाठी महत्त्वाची नियमावली जारी केली आहे:

  1. मुलांच्या भावनांना समजून घेत त्यांच्याशी सतत संवाद साधा.
  2. घरात विश्वासाचे वातावरण निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे.
  3. अडचणीत असताना मुलांनी पालक, शिक्षक किंवा विश्वासू व्यक्तींशी संवाद साधावा.
  4. समाजाने अशा संवेदनशील विषयांवर जागरूकता वाढवावी आणि मानसिक तणावात असलेल्या व्यक्तींना आधार द्यावा.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com