सूरज कसबे
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आला. त्यामुळे बदलापूरच्या त्या चिमुरडींना न्याय मिळाला. बदलापूर प्रकरणात प्रमाणेच मावळमध्ये ही एका सहा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करण्यात आले होते. त्यानंतर तिचा खून ही करण्यात आला होता. या घटनेला दोन वर्ष झाली. प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टासमोर चालवण्यात आले. या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षाही सुनावण्यात आली. त्यालाही आता सात ते आठ महिने उलटून गेले. पण त्याला काही फासावर लटकवले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या त्या चिमुरडीच्या पालकांनी आम्हीही एन्काउंटरचीच वाट बघायची का? असा संतप्त सवाल केला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यामध्ये एका सहा वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करून 26 वर्षीय नराधमाने तिचा निर्घृण खून केला होता.या घटनेला दोन वर्ष उलटून गेली आहेत. या प्रकरणाचा तपास पूर्ण होऊन हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात आलं. त्यानंतर घटनेतील नराधम आरोपी तेजस महिपती दळवीला फाशीची शिक्षा देखील सुनावण्यात आली. मात्र , फाशीची शिक्षा सुनावल्या नंतर आता सहा ते आठ महिने उलटून गेले आहेत. तरीही आरोपीला फाशी दिली जात नाही.
ट्रेंडिंग बातमी - DJ चा दणका! चार तास DJ समोर थांबला, घरी गेल्यावर बहिरा झाला, डॉक्टर म्हणाले...
दुसरीकडे बदलापूर प्रकणातील आरोपीचं एन्काउंटर करण्यात आलं. त्या माध्यमातून पीडिट कुटुंबाला एक प्रकारे न्याय मिळाला. त्यांच्या या प्रकरणातून होणारा मनस्ताप कुठे तरी थांबला. पण आमच्या नशिबी मात्र अजूनही त्रास आहे. त्या नराधमाला शिक्षा होवूनही फासावर लटकवले जात नाही. एन्काउंटर करणे हा मार्ग नाही हे मान्य आहे. पण आम्ही अजून किती काळ त्याला फासावर लटकवण्याची वाट पाहायची असा संतप्त सवाल पीडित कुटुंबाने विचारला आहे. त्यामुळे आरोपीला तात्काळ फासावर देवून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी त्या कुटुंबाने केली आहे.
ट्रेंडिंग बातमी - लाडकी बहिण योजनेचा तिसरा हफ्ता कधी जमा होणार? तारीख आली समोर
मावळ तालुक्यातील कोथुर्णे गावात हा गुन्हा घडला होता. 2 ऑगस्ट 2022 साली एका 6 वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आले. त्यानंतर तिचा खून करण्यात आला. पुढच्याच दिवशी म्हणजे 3 ऑगस्ट ला तिचा मृतदेह भेटला होता. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला चोवीस तासाच्या आता अटक केली होती. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टासमोर चालले. 29 साक्षिदार तपासले गेले. पुढे 23 मार्च 2024 रोजी आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली गेली. मात्र त्याची अजूनही अंमलबजावणी करण्यात आलेली नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world