जाहिरात

Mumbai Local Fight: मुंबई लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यात पुन्हा राडा! महिलेने सहप्रवाशांवर थेट केला घातक प्रयोग

Mumbai Local Fight: मुंबई लोकलच्या फर्स्ट क्लास महिला डब्यात सीटच्या वादातून अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. रेल्वे पोलिसांनी केलेली कारवाई आणि नेमका काय वाद होता, याची सविस्तर माहिती वाचा या रिपोर्टमध्ये.

Mumbai Local Fight: मुंबई लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यात पुन्हा राडा! महिलेने सहप्रवाशांवर थेट केला घातक प्रयोग
"Mumbai Local Fight: लोकल ट्रेनच्या फर्स्ट क्लासमध्ये पुन्हा राडा"
Canva

Mumbai Local Fight: मध्य रेल्वेवर लोकल ट्रेनमध्ये गुरुवारी (16 जुलै) सकाळी सीटवरून झालेल्या वादादरम्यान एका महिलेने अन्य महिला प्रवाशांवर कथित स्वरुपात 'मिरची स्प्रे' (पेपर स्प्रे) फवारल्याचे वृत्त समोर आले आहे. मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मिरची स्प्रेची ही घटना सकाळी गर्दीच्या वेळेस ट्रेनच्या फर्स्ट क्लास महिला डब्यात घडली. काही महिला प्रवासी डोबिंवलीहून कल्याणपर्यंत केवळ सीट पकडण्यासाठी प्रवास करतात, जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्टेशनपर्यंत प्रवास करताना त्यांना ट्रेनमध्ये सीट मिळू शकेल. कारण कल्याणहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या सकाळच्या लोकल ट्रेनमध्ये सहसा तुडुंब गर्दी असते.

ट्रेनमधील पहिली घटना: महिलेने फवारला पेपर स्प्रे

अधिकाऱ्याने सांगितले की, डोंबिवलीहून येणाऱ्या महिलांनी सीट अडवून ठेवल्याने कल्याणहून ट्रेनमध्ये चढणाऱ्या महिलांना बसण्यासाठी जागा मिळत नाही. याच गोष्टीवरून गुरुवारी सकाळी दोन्ही गटांतील महिलांमध्ये बाचाबाची झाली. अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, डोंबिवलीहून प्रवास करणाऱ्या एका महिलेने कथितपणे आपल्या बॅगमधून मिरची स्प्रे काढला आणि कल्याणहून ट्रेनमध्ये चढलेल्या महिलांवर फवारला. ट्रेन सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास सीएसएमटीला पोहोचल्यानंतर लोहमार्ग पोलीस (जीआरपी) आणि रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ) जवान डब्यात पोहोचले आणि प्रकरणाचा तपास सुरू केला. अधिकाऱ्याने सांगितले की, कथितपणे मिरची स्प्रेचा वापर करणाऱ्या महिलेला पुढील कारवाईसाठी जीआरपीने ताब्यात घेतले आहे. 

ट्रेनमधील दुसरी घटना: हाणामारीत प्रवाशांला गंभीर दुखापत 

तर दुसऱ्या एका लोकल ट्रेनमध्ये झालेल्या हिंसक वादात तीन पुरूष जखमी झाले आहेत. कल्याण जीआरपीच्या वरिष्ठ निरीक्षक अर्चना दुसाने यांनी सांगितले की, परळ-अंबरनाथ लोकल ट्रेनच्या सामानाचा डबा असलेल्या (लगेज) डब्यात 16 जुलै रोजी जवळपास 12:30 (AM) वाजेच्या सुमारास सीटवरून झालेल्या भांडणात तीन पुरुष जखमी झाले आहेत. डोंबिवली आणि ठाकुर्ली स्टेशनदरम्यान सीट शेअर करण्यावरून तिघांमध्ये वाद झाला, ज्याचे नंतर हाणामारीत रूपांतर झाले.

एका व्यक्तीने हातामध्ये घातलेल्या धातूच्या कड्यामुळे प्रवासी जखमी झाल्याचे म्हटले जात आहे. घटनेची माहिती मिळताच जीआरपी आणि रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ) जवान कल्याण रेल्वे स्टेशनवर ट्रेनमध्ये पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. मध्य रेल्वेने एका निवेदनात सांगितले की, या घटनेत राजू वाघे (वय 19 वर्षे), साहिल खंडारे (वय 19 वर्षे) आणि प्रीतेश कनोजिया (वय 31 वर्षे) जखमी झाले आहेत. निवेदनानुसार, डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे जखमींपैकी एकाला मुंबईच्या लोकमान्य टिळक महानगरपालिका रुग्णालयात (सायन रुग्णालय) दाखल करण्यात आले आहे.

(नक्की वाचा: Kalyan: मित्र आणि बापाला VIDEO वाटून उच्चपदस्थ तरुणीवर अत्याचार; परदेशात लपलेला कल्याणचा आरोपी कसा पकडला?)

ट्रेनमधील तिसरी घटना: हातात लाकडी दांडके घेऊन दहशत

दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये मुंबई महानगर क्षेत्रातील एका लोकल ट्रेनच्या डब्यात काही लोकांमध्ये हाणामारी होताना दिसत आहे. पण ही घटना कधी घडली आणि यामध्ये कोणी जखमी झाले की नाही, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, दुसऱ्या एका घटनेत सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती बुधवारी (15 जुलै) रात्री कुर्ला रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर हातात लाकडी दांडके घेऊन धावताना दिसली. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये काही काळ घबराट पसरली होती, त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला पकडले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्या व्यक्तीची ओळख साजिद अब्दुल करीम चौधरी (वय 49 वर्षे) अशी पटली आहे. तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचे दिसून आले. पुढील चौकशीसाठी त्याला जीआरपीने ताब्यात घेतले आहे.
(Content Source PTI)

संपूर्ण बातमी वाचा
Listen to the latest songs, only on JioSaavn.com