जाहिरात

VIDEO: लोकलमध्ये परप्रांतीयांची मुजोरी, भरगर्दीत MSF जवानाला काट डालुंगाच्या धमकीसह मारहाण; धक्कादायक VIDEO

Viral Video: चक्क MSF जवानावरच हल्ला झाल्याने सर्वसामान्य प्रवाशांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झालंय.

VIDEO: लोकलमध्ये परप्रांतीयांची मुजोरी, भरगर्दीत MSF जवानाला काट डालुंगाच्या धमकीसह मारहाण; धक्कादायक VIDEO
"Viral Video: लोकलमध्ये भरगर्दीत जवानावर हल्ला"
NDTV Marathi

- रिझवान शेख, प्रतिनिधी

Viral Video: मुंबईच्या लोकल गाड्यांमध्ये वाढती गर्दी आणि त्यातून निर्माण होणारे वाद आता हिंसक वळण घेऊ लागल्याचं दिसतंय. काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीची रेल्वे स्टेशनवर हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता चक्क जवानालाच जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आलीय. विक्रोळी रेल्वे स्टेशनवर कल्याणच्या दिशेला जाणाऱ्या लोकलमध्ये MSF जवानाला चार ते पाच परप्रांतीयांनी मिळून अमानुषपणे मारहाण केल्याची घटना घडली आहे. आकाश बाबर असे मारहाण करण्यात आलेल्या जवानाचे नाव आहे, ते बीकेसी (BKC) येथे कार्यरत आहेत.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, आकाश बाबर हे कल्याण लोकलने प्रवास करत होते. प्रवासादरम्यान त्यांचा परप्रांतीय तरुणाशी किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद तिथेच मिटेल असे वाटत असताना, तरुणाने टोळीसह आकाश बाबर यांना मारहाण करत काट डालुंगा अशी धमकी दिली. या टोळीने रेल्वेमध्येच आकाश बाबर यांच्या अंगावर धावून जाण्याचाही प्रयत्न केला. आधीच्या लोकलमध्ये संबंधित तरुणासोबत आकाश बाबर यांचे वाद झाले. यानंतर आकाश विक्रोळी रेल्वे स्टेशनवर उतरले असता काही माणसांना बोलावून हा तरुण लोकलमध्ये शिरला. या घटनेमुळे रेल्वेतील अन्य प्रवाशांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले. 

'काट डालुंगा'ची धमकी

केवळ मारहाण करून हे तरुण थांबले नाहीत, तर त्यांनी आकाश बाबर यांना "काट डालुंगा" अशी उघड धमकीही दिली. सुरक्षा यंत्रणेत कार्यरत असलेल्या एका जवानाला अशा प्रकारे भरदिवसा आणि गर्दीच्या ठिकाणी धमकी दिली गेल्याने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.

(नक्की वाचा:Gondia News: प्रेम की घात? गोंदियातील तरुणीची मध्य प्रदेशात हत्या, मृतदेह कुजला; हातावरील टॅटूने उलगडलं गुपित)

लोकलमधील वाढती गुंडगिरी आणि प्रवाशांची सुरक्षा

मुंबई लोकलमध्ये परप्रांतीयांकडून होणारी मुजोरी आणि दादागिरीच्या तक्रारी गेल्या काही दिवसांपासून वाढत आहेत. किरकोळ धक्काबुक्की किंवा जागेच्या वादावरून प्रवाशांना धमकावणे, गटबाजी करून मारहाण करणे असे प्रकार सररास घडत आहेत. पण आता चक्क MSF जवानावरच हल्ला झाल्याने रेल्वे पोलिसांच्या (GRP) आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

(नक्की वाचा: Pune News: पुण्यातील शिरूर-न्हावरे चौफुला रस्ता रक्ताने माखला, भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू)

कारवाईची मागणी

या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने आणि पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या गुंडांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झालंय. गुन्हेगारांवर जरब बसवण्यासाठी पोलिसांनी त्वरित पावले उचलणे गरजेचे आहे.

Mumbai Local मुंबई लोकलमध्ये परप्रांतीयांची मुजोरी, MSF जवानाला मारहाण । पाहा संपूर्ण व्हिडीओ

Listen to the latest songs, only on JioSaavn.com