जाहिरात

Crime News: दिव्यशक्ती असल्याची बतावणी, ॲपद्वारे भक्तावर वॉच, पुण्यातील भोंदुबाबा अटकेत

भोंदू बाबाने आर्थिक फसवणूक केल्याचेही फिर्यादित सांगण्यात आलं आहे. फिर्यादी बरोबरच इतरही अनेकांना या बाबा ने फसवणूक केल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

Crime News: दिव्यशक्ती असल्याची बतावणी, ॲपद्वारे भक्तावर वॉच,  पुण्यातील भोंदुबाबा अटकेत

सुरज कसबे, पिंपरी चिंचवड: आपल्याकडे दिव्यशक्ती असल्याचे भासवत मोबाईल अँपद्वारे भक्तांवर नजर ठेवणाऱ्या भोंदू बाबाला बावधन पोलिसांनी अटक केली आहे. प्रसाद दादा उर्फ दादा उर्फ प्रसाद दादा भीमराव तामदार असं अटक केलेल्या 29 वर्षीय भोंदू बाबाचे नाव आहे.

नक्की वाचा- Political News : संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरला 150 कोटींची जमीन 'बक्षीस'; पोलिसांकडून चौकशी सुरु)

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  पिंपरी चिंचवड  पोलिस आयुक्तालयाच्या बावधन पोलिसांनी एका भोंदू बाबाला अटक केलीय. प्रसाद दादा उर्फ दादा उर्फ प्रसाद दादा भीमराव तामदार असं अटक केलेल्या 29 वर्षीय भोंदू बाबाच नाव आहे. त्याच्या विरुद्ध एका 39 वर्षीय व्यक्तींन बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार या भोंदू बाबांन त्याच्याकडे दिव्यशक्ती असल्याच बसवत फिर्यादीला अनेक गोष्टी करण्यास भाग पाडले.

या भोंदू बाबांनी फिर्यादीच्या मोबाईल मध्ये एक ॲप डाऊनलोड करत त्याद्वारे मोबाईलचा ऍक्सेस मिळवत फिर्यादी आणि त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्याच्या खाजगी घटनांवर लक्ष ठेवले. एवढेच नाही तर फिर्यादीला प्रेयसीबरोबर अश्लील कृत्य त्याच बरोबर वेश्या गमन करण्यासही भाग पाडल्याचं आणि मोबाईल ॲपद्वारे ते बाबाने पाहिल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आलं आहे.

(नक्की वाचा-  Pune News : शिंदे गट-अजित पवार गट एकमेकांशी भिडले, पुण्यात मोहल्ला कमिटी बैठकीत राडा)

दरम्यान, या भोंदू बाबाने आर्थिक फसवणूक केल्याचेही फिर्यादित सांगण्यात आलं आहे. फिर्यादी बरोबरच इतरही अनेकांना या बाबा ने फसवणूक केल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com