जाहिरात

Dancebar News: डान्सबारवर पोलिसांची धाड, आतला नजरा पाहाताच पोलिस हबकले, एक बटण दाबलं अन्...

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांमध्ये बारमालक, व्यवस्थापक, वेटर्स आणि इतर संबंधितांचा समावेश आहे.

Dancebar News: डान्सबारवर पोलिसांची धाड, आतला नजरा पाहाताच पोलिस हबकले, एक बटण दाबलं अन्...
मीरारोड:

मनोज सातवी

डान्सबारवर बंदी आहे असं सांगितलं जातं. पण प्रत्यक्षात अनेक ठिकाणी डान्सबार अजूनही सुरू आहेत. पनवेलमधल्या डान्सबारवर मनसैनिकांनी थेट हल्ला करत तो बंद पाडला होता. त्यानंतर या डान्सबारचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला होता. त्यावेळी तरी या डान्सबारना आळा बसेल असं वाटत होतं. पण तसं होताना दिसत नाही. पनवेलचं डान्सबारचं लोण आता थेट मीरा भाईंदरपर्यंत पसरल्याचं दिसत आहे. पोलिसांनी इथं आज टारझन नावाच्या डान्सबारवर धडक कारवाई केली. त्यावेळी जे काही पोलिसांनी पाहिलं ते पाहून तेही हबकून गेले.  

मीरा-भाईंदर परिसरातील  टारझन डान्स बार आहे. त्यावर  पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान एकूण 21 जणांना अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर बारमधून 12 मुलींना मुक्त करण्यात आले आहे.  ज्यापैकी 5 मुली गुप्त खोलीत लपवून ठेवण्यात आल्या होत्या प्रथम दर्शनी तुम्हाल तो आरसा वाटेल. पोलिसांनाही तो आरसा असल्याचा भास झाला. पण ज्यावेळी तपास आणि चौकशी केली त्यावेळी काही भलताच प्रकार पोलिसां समोर आला. मुलींना लपवण्यासाठी भन्नाट शक्कल लढवली गेली होती. 

नक्की वाचा - Bhiwandi News: प्रेम कहाणीचा भयानक अंत! शरीराचे 2 तुकडे, शीर सापडलं पण धड नाही, हत्यारा कोण?

आरशाची पुर्ण भिंत होती. पण त्या मागे एक गुप्त खोली होती. त्याचा एक स्विच होता. तो दाबल्यानंतर हे आरशे आपोआप उघडतात. त्याच्या आतमध्ये एक खोली होती. त्याच खोलीत या पाच मुलींना लपवले होते. हे पाहून पोलिसही हबकून गेले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारमध्ये अश्लील नृत्य सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही धाड टाकण्यात आली. धाड टाकताना बारमालक व व्यवस्थापकांनी मुलींना लपवण्यासाठी गुप्त कॅविटीचा वापर केल्याचे स्पष्ट झाले. मात्र पोलिसांनी या सर्वांना शोधून सुरक्षित बाहेर काढले.

नक्की वाचा - Bengaluru Crime New: तिची 2 तर त्याची 3 लग्न, लिव इनमध्ये राहिले मग वेगळे झाले, पण थरकाप उडवणारा शेवट

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांमध्ये बारमालक, व्यवस्थापक, वेटर्स आणि इतर संबंधितांचा समावेश आहे. तर मुक्त केलेल्या मुलींना महिला पुनर्वसन केंद्रामध्ये पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई झाल्यानंतर मीरा-भाईंदर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून अशा प्रकारच्या अवैध डान्स बारवर पुढील काळातही कठोर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com