जाहिरात

PUNE CRIME: 85 वर्ष महिलेला फरफटत नेलं, जिन्यामध्येच 23 वर्षाच्या तरूणाने केले पाऊण तास अत्याचार

हिंजवडी परिसरात एका 85 वर्षीय वृद्ध महिलेवर 23 तरूणाने लैंगिक अत्याचार केले आहेत. ती राहात असलेल्या उच्चभ्रू सोसायटीमध्येच हा प्रकार घडला.

PUNE CRIME: 85 वर्ष महिलेला फरफटत नेलं, जिन्यामध्येच 23 वर्षाच्या तरूणाने केले पाऊण तास अत्याचार
पुणे:

पुण्यात हिंजवडीमध्ये सर्वांनाच हादरवून टाकणारी एक घटना घडली आहे. या घटनेमुळे पुण्यात नक्की सुरू तरी काय आहे असा प्रश्न पडला आहे.आयटीनगरी म्हणून ओळख असलेल्या हिंजवडी परिसरात एका 85 वर्षीय वृद्ध महिलेवर 23 वर्षीय तरूणाने लैंगिक अत्याचार केले आहेत. ती राहात असलेल्या उच्चभ्रू सोसायटीमध्येच हा प्रकार घडला. फ्लॅटच्या बाजूला असलेल्या जीन्यात या वृद्ध महिलेला फरफटत नेण्यात आले. त्यानंतर त्या नराधमाने तिच्या वयाचाही विचार न करता तिच्यावर पाऊण तास अत्याचार केले. तीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण कोणीही तिच्या मदतीला धावून आले नाही. तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार झाल्याचेही समोर येत आहे. या घटनेमुळे सर्वच जण हादरून गेले आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

या प्रकरणी पोलिसांनी ओम जयचंद पुरी या 23 वर्षीय आरोपीला पकडले आहे. ओम हा मुळचा धाराशिवचा आहे. तो इलेक्ट्रीशनचं काम करतो. हेच काम करण्यासाठी तो या वृद्ध महिलेच्या सोसायटीमध्ये आला होता. काम सुरू असताना त्याने महिला एकटी असल्याचे पाहीले. थोडा अंदाज घेतला. त्यानंतर त्याने या महिलेवर झडप घातली. महिलेचे तोंड दाबले. त्यानंतर त्याने तिला जिन्याच्या दिशेला नेले. तिथेच तिच्यावर अत्याचार केले. या गंभीर घटने प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी आरोपी ओम जयचंद पुरी ला अटक केली आहे. मेडिकल रिपोर्टमधून वृद्ध महिलेवर अत्याचार झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

ट्रेंडिंग बातमी - Akshay Shinde Encounter : 'अक्षय शिंदेचा एन्काउंटर नाही', उच्च न्यायालय म्हणाले...

रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आरोपी ओम जयचंद पुरी हा सोसायटीत गेला. पाचव्या मजल्यावर फ्लॅटच्या समोरच शतपावली करत असलेल्या महिलेच तोंड दाबून फरफटत सहाव्या मजल्याच्या पॅसेजमध्ये नेलं. तिथं महिलेवर अनैसर्गिक अत्याचार केले. या महिलेला गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न ही त्याने  केला होता. त्यानंतर महिलेने आरडाओरडा केला. कोणी येईल या भितीने मग आरोपीने घटनास्थळावरून धूम ठोकली.  

ट्रेडिंग बातमी - अक्षय शिंदेचं घर महिन्याभराने उघडलं, मृतदेह आणणार, घरी कोण-कोण आले?

पीडित महिला घरात न आल्याने तिचा शोध घेण्यात आला. तेव्हा त्या इमारतीच्या पॅसेजमध्ये जखमी अवस्थेत आढळल्या. पीडित वृद्ध महिलेला तात्काळ रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. तिथं त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार झाल्याचं निष्पन्न झालं. हिंजवडी पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. हिंजवडी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे अवघ्या तासात आरोपीला अटक केली आहे. विकृत आणि संतापजनक घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी हा त्याच सोसायटीमध्ये इलेक्ट्रीशनचे गेल्या काही महिन्यांपासून काम करत होता. आरोपीला न्यायालयात हजर केलं असता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आली आहे.

Switch To Dark/Light Mode
Previous Article
फिल्म इंडस्ट्री हादरली! मल्याळम अभिनेता Edavela Babu वर लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली मोठी कारवाई
PUNE CRIME: 85 वर्ष महिलेला फरफटत नेलं, जिन्यामध्येच 23 वर्षाच्या तरूणाने केले पाऊण तास अत्याचार
builders-son-kidnapped-for-40-crore-ransom-in-ambernath-10-arrested
Next Article
अंबरनाथमध्ये 40 कोटींच्या खंडणीसाठी बिल्डरच्या मुलाचं अपहरण, 12 तासांमध्येच...