जाहिरात

अक्षय शिंदेचं घर महिन्याभराने उघडलं, मृतदेह आणणार, घरी कोण-कोण आले?

अक्षय शिंदेच्या आई-वडिलांनी या एन्काउंटरविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. वकील अमित कटारनवरे यांनी अक्षयच्या वडिलांचं वकीलपत्र घेतलं आहे. हा एन्काउंटर फेक असल्याचा आरोप अक्षयच्या वकिलांकडून केला जात आहे.

अक्षय शिंदेचं घर महिन्याभराने उघडलं, मृतदेह आणणार, घरी कोण-कोण आले?
बदलापूर:

निनाद करमरकर 

अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. त्याच त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जेजे हॉस्पिटलमध्ये करण्यात आले. शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह हा कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यात आला आहे. सध्या त्याचा मृतदेह तिथेच असून तो त्याच्या बदलापूर इथल्या रहात्या घरी नेण्यात येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे बदलापूर इथल्याच्या त्याच्या राहत्या घरी त्याचे नातेवाईक जमा झाले आहेत. शिवाय तब्बल एक महिन्यानंतर त्याचे बदलापूर इथले घरही उघडण्यात आले आहे. घरात एक दिवा नातेवाईकांना लावला आहे. शिवाय परिसरात सध्या तणावाचे वातावरण आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

बदलापूर अत्याचार प्रकरणातला मुख्य आरोपी अक्षय शिंदे हा बदलापूरच्या खरवई परिसरात राहात होता. त्याचे तिथे छोटे घर आहे. हे प्रकरण झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या घराचीही लोकांनी तोडफोड केली होती. तेव्हा पासून त्याचे घर हे बंद होते. शेवटी त्याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांना देण्यात येणार आहेत. त्याच्यावर बदलापूर इथेच अंत्यसंस्कार होणार आहेत. हे समजल्यानंतर त्याचे नातेवाईक बदलापूर इथल्या त्याच्या घरी दाखल झाले आहेत. 

ट्रेंडिंग बातमी - Akshay Shinde Encounter : 'अक्षय शिंदेचा एन्काउंटर नाही', उच्च न्यायालय म्हणाले...

घरा बाहेर ते त्याच्या मृतदेहाची वाट पाहात आहेत. मात्र त्याचा मृतदेह बदलापूरला येणार आहे की नाही याची काही माहिती त्याच्या नातेवाईकांना नाही. आता आम्हाला विचारून काय करता? आम्हाला काहीच माहित नाही, मृतदेह आणणार आहेत की नाही याचीही कल्पना नाही. मात्र आपण इथे आलो आहोत असं त्यांनी सांगितलं. शिवाय त्याचे घरही एक महिन्यानंतर उघडले आहे. काही नातेवाईक घराबाहेर बसून आपले दुख: व्यक्त करत आहेत. पण खुले पणाने बोलण्यास कोणीही तयार नाही अशी स्थितीत आहे. शिवाय परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.  

ट्रेंडिंग बातमी - 'बदला' पुरा! अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर फडणवीसांचा तो फोटो व्हायरल; पोस्टरची मुंबईभर चर्चा! 

दरम्यान अक्षय शिंदे याच्या मृतदेहावर आज अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आहे. यासाठी अक्षय हा राहात असलेल्या बदलापूरच्या खरवई परिसरातील त्याच्या घराजवळ त्याचे नातेवाईक जमा झालेत. मात्र अजूनही अक्षयचा मृतदेह कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात असून तो बदलापूरला नेमका कधी आणला जाईल, याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. मात्र तरी देखील अक्षय याचे नातेवाईक बदलापूरमधील त्याच्या घराच्या परिसरात जमलेले आहेत. 

ट्रेंडिंग बातमी - 'आम्हीही एन्काऊंटरचीच वाट बघायची का?' मावळच्या 'त्या' चिमुरडीच्या पालकांचा टाहो

या सर्व घडामोडी घडत असताना अक्षय शिंदेच्या आई-वडिलांनी या एन्काउंटरविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. वकील अमित कटारनवरे यांनी अक्षयच्या वडिलांचं वकीलपत्र घेतलं आहे. हा एन्काउंटर फेक असल्याचा आरोप अक्षयच्या वकिलांकडून केला जात आहे. नजीकच्या काळात निवडणुका असल्याने हे सत्ताधाऱ्यांचा आदेशामुळे खून केल्याचा आरोप अक्षयच्या वडिलांच्या वकिलांनी केला आहे. ते पुढे म्हणाले, अशा पद्धतीच्या घटनांमुळे आपण पोलिसांना या प्रकारच्या गोष्टी करण्यासाठी पाठिंबा देतो, असा त्याचा अर्थ निघतो. मग कायदा आणि सुव्यवस्था कशासाठी आहे. देवाचा न्याय अशा पोस्ट सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत. अशा घटनांमुळे पोलिसांना प्रोत्साहन दिलं जात आहे. जे न्यायव्यवस्थेसाठी अत्यंत घातक आहे असे त्याच्या आई वडीलांचे म्हणणे आहे.  

Switch To Dark/Light Mode
Previous Article
माझी बायको बनून राहा! 60 वर्षांच्या आईसोबत मुलाने जे केलं ते भयंकर होतं
अक्षय शिंदेचं घर महिन्याभराने उघडलं, मृतदेह आणणार, घरी कोण-कोण आले?
malayalam-actor-edavela-babu-arrested-in-metoo-probe-details
Next Article
फिल्म इंडस्ट्री हादरली! मल्याळम अभिनेता Edavela Babu वर लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली मोठी कारवाई