1 इंजिनिअर, 2 बीटेकचे विद्यार्थी, कसिनोत पैसा गमावला, वसुलीसाठी निवडला भयंकर मार्ग अन्...

इंजिनिअरींगचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने बीटेकच्या दोन विद्यार्थ्यांबरोबर मिळून असा काही कारनामा केला आहे की सर्वच जण आवाक झाले आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
पुणे:

शॉर्टकटने पैसा कमावण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. त्यासाठी मग आपण काय शिकत आहोत. कोणत्या घरातले आहोत याचेही भान राहात नाही. असा काहीसा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. इथं इंजिनिअरींगचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने बीटेकच्या दोन विद्यार्थ्यांबरोबर मिळून असा काही कारनामा केला आहे की सर्वच जण आवाक झाले आहे. इंजिनिअरींग आणि बीटेकचे विद्यार्थी असं काही करू शकतात याचाही विचार कोणी केला नसले. पण पैशाची हवा कोणाला काय करायला लावेल याचेच हे उत्तम उदाहरण म्हणाले लागेल. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पुण्यात इंजिनिअरींगचे शिक्षण घेणारा विद्यार्थ्याने बीटीकेच्या दोन विद्यार्थ्यांबरोबर मिळून एक गँग बनवली. इंजिनिअरींग शिक्षणार 23 वर्षाच्या या विद्यार्थ्याला ऑनलाईन कसिनोचा नाद होता. त्यात त्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. अशा वेळी हे पैसे कसे वसूल करायचे असा विचार त्याच्या डोक्यात सुरू होता. त्यातूनच त्याच्या डोक्यात एक भयंकर कल्पना आली. त्यासाठी त्याने दोन बीटेकच्या विद्यार्थ्यांची मदत घेण्याचे ठरवले. त्याने आपला प्लॅन या दोघांना सांगितला आणि आपल्या बरोबर त्यांना सामिल करून घेतले. 

ट्रेंडिंग बातमी -  मोबाइलवर मालिका पाहू नको, आईने लेकाला हटकले, लेकाने भयंकर कृत्य केले

 रॉयल एनफील्डचे क्रेझ सगळीकडे आहे. यागाड्या खरेदी करण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. त्यात जर कमी किंमत मिळत असेल तर कोणीही ती गाडी खरेदी करते. ही बाब हेरून इंजिनिअरींग शिक्षणाऱ्या या विद्यार्थ्याने रॉयल एनफील्ड बाईची रेकी केली. त्यानंतर या गाड्यांचे लॉक तोडून त्या चोरी केल्या. चोरी केलेल्या गाड्या बीटेकच्या विद्यार्थ्यांमार्फत पुण्याबाहेर विकण्याचा सपाटा लावला. अचानक रॉयल एनफील्डच्या गाड्या चोरी कशा होत आहेत याचा प्रश्न पोलिसांना पडला. 

ट्रेंडिंग बातमी - मुख्यमंत्रिपदासाठी पवारांची पहिली पसंती कोण? थेट संकेत दिले, 'त्या' नेत्याचे स्वप्न पूर्ण होणार?

या गाड्यांना मोठी मागणी आणि पुनर्विक्री मूल्यामुळे त्या चोरांचे प्रमुख लक्ष्य ठरल्या होत्या. विद्यार्थ्याने चोरी केलेल्या रॉयल एनफील्ड बाईक पुण्याबाहेर विकण्यासाठी दोन बीटेक विद्यार्थ्यांसह साथीदारांच्या मदतीने त्यांची विक्री केली होती. ते बाइकची लॉक तोडून चोरी करत होते. त्यानंतर त्या विविध ठिकाणी जावून विकत असत. या टोळीने डिजिटल प्लॅटफॉर्मचा ही वापर करून गाड्यांच्या विक्री आणि व्यवहार केले होते. ज्यामुळे पुण्याबाहेरील ग्राहकही त्यांना मिळाले होते.

ट्रेंडिंग बातमी - शरद पवारांचा मास्टर स्ट्रोक, शिंदेंसह भाजपाला मोठ्ठा धक्का, 'हा'आमदार पवारांच्या जाळ्यात

अखेर या सर्वांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. केवळ पैशासाठी असे कृत्य हे उच्च दर्जाचे शिक्षण घेणारे हे विद्यार्थी करत होते. पोलिसही त्यांच्या याकृतीने आवाक झाले आहेत. एखाद्या सराईत गुन्हेगाराला शोभेल असेल कृत हे विद्यार्थी करत होते. त्यांना हे करत असताना कोणत्याही गोष्टीचा पश्चाताप होत नव्हता. अखेर पोलिसांच्या जाळ्यात ते अडकले आहेत. आता त्यांना पोलिस कोठडी मिळाली असून पुढील तपास पोलिस करत आहे. शिवाय त्यांनी एकूण किती गाड्या चोरल्या आहेत? त्या कोणाला विकल्या आहेत? याची माहिती पोलिस मिळवत आहेत.