जाहिरात

शरद पवारांचा मास्टर स्ट्रोक, शिंदेंसह भाजपाला मोठ्ठा धक्का, 'हा'आमदार पवारांच्या जाळ्यात

विद्यमान आमदार पवारांच्या गळाला लागल्यामुळे शिंदे आणि भाजपसाठी हा धक्का समजला जातोय.

शरद पवारांचा मास्टर स्ट्रोक, शिंदेंसह भाजपाला मोठ्ठा धक्का, 'हा'आमदार पवारांच्या जाळ्यात
चंद्रपूर:

विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजूनही जागा वाटपाची चर्चा युती आणि आघाडीत सुरू आहे. अशा वेळी आजी माजी आमदार चाचपणी करत आहेत. अशात शरद पवारांनी आपले फासे टाकण्यास सुरूवात केली आहे. त्यातूनच भाजप आणि शिंदे सेनेतील काही बडे मासे शरद पवारांच्या गळाला लागत आहेत. त्यात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अगदी जवळचे मानले जाणारे आमदार किशोर जोरगेवार हे राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. जोरगेवार हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशीही चर्चा होती. पण त्यांनीच या चर्चेला पूर्ण विराम देत आपण शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

किशोर जोरगेवार हे चंद्रपूरचे अपक्ष आमदार आहेत. ते सुरूवातीपासून भाजप आणि शिवसेनेबरोबर राहीले आहेत. मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी आपला मार्ग बदलला आहे. त्यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत त्यांची प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या बरोबर चर्चाही झाली आहे. अशी माहिती जोरगेवार यांनी दिली आहे.    

ट्रेंडिंग बातमी - विधानसभा निवडणूक जाहीर होताच महायुतीला धक्का, एक पक्ष पडला बाहेर

त्यामुळे चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या हातात लवकरच तुतारी दिसणार आहे.चंद्रपूर विधानसभेची जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळाल्यास, मी निवडणूक लढण्यास तयार असल्याचं जोरगेवार यांनी जयंत पाटील यांना सांगितले आहे. याबाबत जयंत पाटील यांनी आपल्याला संपर्क केला होता. शिवाय चंद्रपूर मधून निवडणूक लढण्याचा प्रस्तावही त्यांनी दिला होता. हा प्रस्ताव आपण स्विकारला आहे असे ही जोरगेवार यांनी स्पष्ट केले. 

ट्रेंडिंग बातमी - LIVE UPDATE : शरद पवारांची मोठी घोषणा, मुख्यमंत्रिपदाचा दावेदार कोण याचे दिले संकेत

चंद्रपूर विधानसभेची जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळावी यासाठी प्रयत्न केले जात आहे. या मतदार संघात गेल्या वेळी जोरगेवार यांनी अपक्ष निवडणूक लढत विजय मिळवला होता. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदार संघातून काँग्रेसच्या उमेदवाराला आघाडी मिळाली होती. त्यामुळे शिंदे की भाजपमध्ये प्रवेश करायचा याचा विचार जोरगेवार करत होते. मात्र ऐन वेळी त्यांनी आता राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यमान आमदार पवारांच्या गळाला लागल्यामुळे शिंदे आणि भाजपसाठी हा धक्का समजला जातोय.  

Listen to the latest songs, only on JioSaavn.com