जाहिरात

मुख्यमंत्रिपदासाठी पवारांची पहिली पसंती कोण? थेट संकेत दिले, 'त्या' नेत्याचे स्वप्न पूर्ण होणार?

जशी निवडणूक जाहीर झाली तसे शरद पवारांनी आपल्या मनातला मुख्यमंत्री कोण असेल, याचे जाहीर पणे संकेत दिले आहेत.

मुख्यमंत्रिपदासाठी पवारांची पहिली पसंती कोण? थेट संकेत दिले, 'त्या' नेत्याचे स्वप्न पूर्ण होणार?
सांगली:

महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदासाठी अनेक इच्छुक आहेत. मुख्यमंत्री कोण असावा याबाबत उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्यासह इतर नेत्यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत वक्तव्य केले आहे. आतापर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत शरद पवारांनी जाहीरपणे वक्तव्य करणे टाळले होते. मात्र जशी निवडणूक जाहीर झाली तसे शरद पवारांनी आपल्या मनातला मुख्यमंत्री कोण असेल, याचे जाहीर पणे संकेत दिले आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाची शिव स्वराज्य यात्रेची सांगता सांगलीतल्या इस्लामपूर इथे झाली. त्यावेळी बोलताना शरद पवारांनी मुख्यमंत्री होवू शकतो याचेच संकेत देऊन टाकले आहेत. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

शरद पवारांनी आतापर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत बोलणे टाळले होते. पण पहिल्यांदाच मविआचे सरकार आल्यास आपल्या मनात कोणाला मुख्यमंत्री करायचे आहे हे जाहीर पणे बोलून दाखवले आहे. महाराष्ट्र सांभाळण्याचा तसेच तो पुढे नेण्याची दृष्टी आणि शक्ती ज्यांच्यामध्ये आहे, असे आपले सहकारी जयंत पाटील आहेत. शिवाय महाविकास आघाडीचे सरकार आल्यास जयंत पाटलांकडेच महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल असे सूचक वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. जयंत पाटील यांची ही मुख्यमंत्री होण्याची महत्वकांक्षा कधी लपून राहीलेली नाही. त्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी केलेले वक्तव्य महत्वाचे समजले जाते.  

ट्रेंडिंग बातमी - शरद पवारांचा मास्टर स्ट्रोक, शिंदेंसह भाजपाला मोठ्ठा धक्का, 'हा'आमदार पवारांच्या जाळ्यात

शरद पवारांनी यावेळी जयंत पाटील यांचे तोंडभरून कौतूक केले.  मला एका गोष्टीचा आनंद आहे की, जयंत पाटील ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरत आहेत. काम करत आहेहत. कष्ट करत आहेत. लोकांना विश्वास देत आहेत. शिवाय दिलासा देण्याचे कामही करत आहे. त्यांच्या प्रयत्नांच्या पाठीशी महाराष्ट्राची तरुण पिढी एका विचाराने निश्चित पुढे जाईल असा मला विश्वास आहे असे शरद पवार यावेळी म्हणाले. शिवाय पाटील यांनी आपल्या नेतृत्वाखाली उद्याचा महाराष्ट्र घडवण्यासाठी, सावरण्याची जाबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यावी. ही तुमची माझी आणि संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा अपेक्षा आहे असे सांगत, जयंत पाटील हेच मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असतील असे संकेत पवारांनी दिले. उद्याचा महाराष्ट्र घडवण्याचे काम याच जिल्ह्यातून होणार आहे असेही ते म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - मराठा पाडणार की लढणार? मनोज जरांगे मोठा निर्णय घेणार? 800 इच्छुकांना बोलावले

शिव स्वराज्य यात्रेची सांगता इस्लामपूरमध्ये झाली. त्यावेळी भाषणासाठी जयंत पाटील उभे राहीले होते. त्यावेळी उपस्थितांनी मुख्यमंत्री- मुख्यमंत्री अशा घोषणा दिल्या. यावेळी जयंत पाटील यांनी सर्वांना शांत राहण्यास सांगितलं. अशा घोषणा देऊन कुणी मुख्यमंत्री होत नाही. त्याला लय उठाबशा काढाव्या लागतात, असे सांगत तुम्ही गप्प बसा आता असे पाटील यांनी बजावले. जयंत पाटील हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. शिवाय पक्षातील सर्वात जेष्ठ नेते ते आहेत. सध्या त्यांच्या ऐवढा अनुभव असलेला नेता दुसरा कोणी नाही. अशा वेळी सत्तेत नेतृत्व करण्याची संधी मिळावी ही अपेक्षाही पाटील यांची आहे. 

ट्रेंडिंग बातमी - विधानसभा निवडणूक जाहीर होताच महायुतीला धक्का, एक पक्ष पडला बाहेर

तर दुसरीकडे खासदार अमोल कोल्हे यांनी वाळव्याचा माणूस 'वर्षा'वर जावा असे थेट विधान केले आहे. उठा उठा निवडणूक आली,आता गद्दारांना घरी बसवण्याची पवारवेळ आली असा हल्लोबोलही त्यांनी विरोधकांवर केला. शिवाय जयंत पाटील मुख्यमंत्री होणार असा दावाही त्यांनी या सभेत केला. यासाठी मात्र राष्ट्रवादीच्या प्रत्येक नेत्याला ताकद लावावी लागेल असे अमोल कोल्हे म्हणाले. हरियाणाच जे काही झालं ते महाराष्ट्रात होणार नाही. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला.   
 

Previous Article
मराठा पाडणार की लढणार? मनोज जरांगे मोठा निर्णय घेणार? 800 इच्छुकांना बोलावले
मुख्यमंत्रिपदासाठी पवारांची पहिली पसंती कोण? थेट संकेत दिले, 'त्या' नेत्याचे स्वप्न पूर्ण होणार?
bjp-may-denied-vidhan-sabha-election-assembly-tickets-to-5-mumbai-mla-ram-kadam-sunil-rane-bharti-lavekar-
Next Article
भाजपाचे मुंबईतील विद्यमान आमदार रेड झोन मध्ये ? 'या' आमदारांचा पत्ता कट होणार?