जाहिरात

Pune Crime News: इंदापूरचे बेपत्ता पोलीस हवालदार अखेर सापडले! एका फोनमुळे लागला छडा

Pune Police : गेल्या चार दिवसापांसून बेपत्ता असलेले इंदापूरचे पोलीस हवालदार विष्णू केमदारणे यांचा अखेर छडा लागला आहे.

Pune Crime News: इंदापूरचे बेपत्ता पोलीस हवालदार अखेर सापडले! एका फोनमुळे लागला छडा
इंदापूर, पुणे:

देवा राखुंडे, प्रतिनिधी

गेल्या चार दिवसापांसून बेपत्ता असलेले इंदापूरचे पोलीस हवालदार विष्णू केमदारणे यांचा अखेर छडा लागला आहे. ते बेपत्ता झाल्यानं पुणे ग्रामीण पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली होती. केमदारणे यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवत पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या सह पोलीस हवालदार रासकर आणि पोलीस कॉन्स्टेबल सूर्यवंशी यांच्या वरती गंभीर आरोप देखील केले होते. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कुठे सापडले केमदारणे ?

अखेर पोलीस हवालदार विष्णू केमदारणे यांना शोधण्यात पोलिसांना यश आल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. विष्णू केमदारणे यांना पुण्यामधून शोधून काढण्यात पोलिसांना यश आलं असून त्यांना त्याच्या कुटुंबाच्या स्वाधीन केलं जाणार आहे अशी सूत्रांची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी  विष्णू केमदारणे यांचा त्यांच्या पत्नीला फोनवरून संपर्क झाला. त्यानंतर त्यांच्या पत्नीने ही गोष्ट इंदापूर पोलिसांना कळवली आणि त्यानंतर पोलिसांनी लोकेशन ट्रेस करत पुण्यातील आळंदी परिसरातून पोलीस हवालदार विष्णू केमदारणे यांना शोधून काढल्याची माहिती आहे.

( नक्की वाचा : Sangli Crime : विवाहित महिलेचा धर्मांतरासाठी छळ, 7 महिन्यांच्या गर्भवतीनं संपवलं आयुष्य! )

काय आहे प्रकरण?

विष्णू केमदारणे यांनी बेपत्ता होण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली होती. त्यामध्ये त्यांनी इंदापूरचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर कोकणे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यामध्ये ते मदारणे याला समजावून सांग त्याला गाडून टाकीन, असं एका पोलीस कर्मचाऱ्याला सांगत होते. त्यामुळे हे प्रकरण आणखी गंभीर बनले. 

पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी पोलीस हवालदार रासकर आणि पोलीस कॉन्स्टेबल सूर्यवंशी यांच्या सांगण्यावरून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. मागील दोन महिन्यांपासून हा प्रकार सुरु आहे. तुझी नोकरी आणि यापुढील आयुष्य हे उद्ध्वस्त करून टाकेल, अशी भाषा वापरून मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे, असं या चिठ्ठीत केमदारणे यांनी  लिहिले होते. माझ्या या अवस्थेला होणाऱ्या परिणामांना पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे हेच जबाबदार आहेत, असा आरोपही त्यांनी या चिठ्ठीत केला होता. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com