
रेवती हिंगवे, पुणे: विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यामध्ये तरुण- तरुणीने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खडकवासला धरण परिसरात एकाच वेळी दोघांनी विष प्राशन करत टोकाचे पाऊल उचलले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
(नक्की वाचा: Radhika Yadav : टेनिसपटूचा 'तो' निर्णय ठरला वडिलांच्या संतापाचं कारण, लेकीवरच झाडल्या 5 गोळ्या )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुण्यातील खडकवासला धरण परिसरात तरुण- तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खडकवासला धरण परिसरात एकाचवेळी विष प्राशन करुन दोघांनी मृत्यूला कवटाळले. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांचेही मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेली तरुणी अल्पवयीन असून तिचे वय केवळ 16 वर्ष इतक आहे. पुण्यातील उत्तम नगर पोलीस स्टेशनमध्ये मृत्यूची नोंद तर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.
( नक्की वाचा : 'माझ्या ब्लाऊजमध्ये हात घातला आणि...' अभिनेत्रीचा पुजाऱ्यावर गंभीर आरोप! )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world