जाहिरात

Pune News : शिंदे गटाच्या पुणे जिल्हा अध्यक्षांचा कौटुंबिक वाद चव्हाट्यावर, दिलीप यादवांवर गुन्हा दाखल

पुणे जिल्हा शिवसेना शिंदे गटाचे अध्यक्ष दिलीप यादव यांनी लग्न सोहळ्यात आपल्याच पुतण्या व पुतणीवर पिस्टल रोखून धमकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune News : शिंदे गटाच्या पुणे जिल्हा अध्यक्षांचा कौटुंबिक वाद चव्हाट्यावर, दिलीप यादवांवर गुन्हा दाखल

देवा राखुंडे, प्रतिनिधी 

पुणे जिल्हा शिवसेना शिंदे गटाचे अध्यक्ष दिलीप यादव यांनी लग्न सोहळ्यात आपल्याच पुतण्या व पुतणीवर पिस्टल रोखून धमकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासवड पोलीस स्टेशनमध्ये आमदार विजय शिवतारे यांची भाची केतकी धनंजय झेंडे यांनी फिर्याद दाखल केली आहे.  यादव हे माजी आमदार विजय शिवतारे यांचे चुलत मेव्हणे आहेत. तर फिर्यादी केतकी धनंजय झेंडे या शिवतारे यांच्या सख्या भाची आहेत. कुटुंबातील जुना वाद असा चव्हाट्यावर आल्याने चर्चेला उधाण आलं आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सासवड पोलीस स्टेशनमध्ये दाखल फिर्यादीनुसार शनिवारी सासवड हडपसर रोडवरील महाराजा लॉन्समध्ये फिर्यादी झेंडे यांचे चुलत भाऊ यांचा साखरपुडा होता. त्या कार्यक्रमाला झेंडे कुटुंबासह उपस्थित होते. यावेळी विनय यादव, दिलिप यादव, सुनिता यादव, शुभांगी दौंडकर, अक्षता यादव, भुजंग यादव, महेश यादव व इतर हे देखील उपस्थित होते. 

फिर्यादी केतकी झेंडे यांचे चुलत भाऊ चिनु /संकेत यादव हा झेंडे यांच्या परिवारातील सदस्यांना खिजविण्याच्या हेतूने जवळ येऊन तुम्ही शनिवारी 'माझ्या लग्नाला दिलीप यादव यांचे कारण देऊन आले नाही, मग आज या साखरपुड्यात कार्यक्रमाला कसे काय आले? यामुळे झेंडे यांचे दोन्ही भाऊ व चुलत भाऊ यांचा चिनु यादव यांच्याशी किरकोळ बाचाबाची झाली. त्यावेळी चुलत भाऊ चिनु हा निघून गेला. पुढे चिनु दिलीप यादव कुटुंबीयांच्या घोळक्यामध्ये गेला व त्यानंतर काही मिनिटात दिलीप यादव, विनय यादव, सुनिता यादव, शुभांगी दौंडकर, अक्षता यादव, भुजंग यादव, महेश यादव व इतर झेंडे यांच्या भावांच्या अंगावर धावून आले. 

Nagpur News: 'या' कारणामुळे नागपूर दंगलीचा मुख्य आरोपी फईम खान याचा जामीन अर्ज फेटाळला

नक्की वाचा - Nagpur News: 'या' कारणामुळे नागपूर दंगलीचा मुख्य आरोपी फईम खान याचा जामीन अर्ज फेटाळला

यातील अक्षता यादव, सुनिता यादव, शुभांगी दौंडकर यांनी दोन्ही भावांना मारहाण केली. या मारहाणीत दोन्ही भावांना वळ येईपर्यंत मारहाण करण्यात आवी. तसेच, या प्रसंगी केतकी धनंजय झेंडे मधे पडल्या असता दिलीप यादव व विनय यादव यांनी त्यांना जोरात ढकलुन दिले. ढकला ढकलीमधे झेंडे यांच्या गळ्यातील टेम्पल हार अंदाजे 3.30 ग्रॅम वजनाचा हार गहाळ झाला. 

याच दरम्यान दिलिप व विनय यादव यांनी कंबरेचा पिस्टल काढून झेंडे व त्यांच्या भावांच्या अंगावर ताणून त्यांना जिवे मारण्याची भीती धातली. पुन्हा सासवडमध्ये दिसलात तर बघा अशी धमकी दिलेली. तसेच, या आधी देखील यादववाडी येथे झेंडे यांचे भाऊ प्रसाद यादव व सागर यादव गेले असता विनय व दिलिप यादव यांनी त्यांचेकडील पिस्टल ऊगारुन जीवे मारणेची धमकी दिलेली होती. 

त्या अनुषंगाने त्यावेळी सासवड पोलीस स्टेशन येथे अदखलपात्र गुन्हा देखल करण्यात आला होता. शनिवारी सासवड हडपसर रोडवरील महाराजा लॉन्समध्ये दिलीप सोपान यादव व केतकी धनंजय झंडे यांच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये झालेल्या वादाची फिर्याद केतकी झेंडे यांनी दाखल केली असून दिलीप यादव यांनीही तीन जणांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com