Pune Nasrapur Rape Case Latest News
पुणे:
अजिंक्य धायगुडे पाटील, प्रतिनिधी
Pune Nasrapur Rape And Murder Case : पुण्यातील भोर येथील नसरापूरमध्ये 65 वर्षांच्या नराधमाने चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळं संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. भीमराव कांबळे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. आरोपीला पुणे ग्रामीण पोलीस दुपारी 3 वाजता कोर्टात हजर करणार आहेत. आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी,अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे. नसरापूर अत्याचाराच्या घटनेचा संपूर्ण घटनाक्रम समोर आला आहे.
नसरापूर घटनेचा संपूर्ण घटनाक्रम खालीलप्रमाणे
- शुक्रवार दुपारी 3 वाजता पीडित चिमुकली राम मंदिर परिसरात शेवटची दिसली.
- दुपारी 3.45 वाजता म्हणजेच पाऊनतास होऊनही मुलगी घरी न आल्याने आजीकडून मुलीचा शोध सुरू
- दुपारी 4 वाजता नसरापूर ग्रामस्थांकडून मुलीची शोधाशोध सुरू
- दुपारी 4.30 वाजता गावातील सीसीटीव्ही तपासले, तेव्हा आरोपी मुलीला घेऊन गोठ्याकडे जाताना दिसला
- संध्याकाळी 5.30 वाजता ग्रामस्थांनी आरोपीला बनेश्वर फाट्यावरून पकडून आणला.चोप मिळताच आरोपीने मुलीचा मृतदेह लपून ठेवलेली जागा गावकऱ्यांना सांगितली.आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिलं.
- संध्याकाळी 6:00 वाजता शेणाच्या ढिगाऱ्यातून पीडित चिमुकलीचा मृतदेह बाहेर काढला.
- संध्यकाळी 7 वाजता संतप्त ग्रामस्थांचा पोलिसांना जागेवरच घेराव. वादावादीनंतर पोलिसांनी मृतदेह हलवला.
- रात्री 8 वाजता ग्रामस्थांचा राजगड पोलीस स्टेशनला घेराव
- रात्री 9 वाजता गावकऱ्यांनी बंगळुरू हायवेवर रास्ता रोको केला.
नक्की वाचा >> Ulhasnagar News: अंबरनाथ शिवमंदिर परिसरातील तरुणाच्या पोटात 5 जणांनी चाकू खुपसला, उल्हासनगरात घडलं असं काही..
- रात्री 11 वाजता एसपी गिल आंदोलन स्थळी दाखल.लेखी आश्वासनानंतर रास्तारोको मागे पण शनिवारी गावबंदीची घोषणा केली.
- शनिवार सकाळी 7 पासून नसरापुरात कडकडीत बंद
- शनिवार सकाळी 9 वाजता फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल,पुरावे गोळा करण्याचे काम सुरू.
- सकाळी 10 वाजता नसरापूरच्या भैरवनाथ मंदिरापासून मोर्चा सुरू.
- सकाळी 11 वाजता सुपर बाजार परिसरात मोर्चा आंदोलन सभेत रूपांतरित
- दुपारी 11:30 पर्यंत गाव पुढारीकडून आंदोलकांची समजून काढली पण तरीही गावकरी ऐकेनाथ
- दुपारी 11:45 वाजता भोरचे आमदार शंकर मांडेकर आंदोलन स्थळी आले.कठोर कारवाईचं आश्वासन दिलं तरीही मोर्चेकरांनी ऐकलं नाही.थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन करण्याची मागणी केली.
नक्की वाचा >> Sambhajinagar News: सहलीला जाणाऱ्या 9 मित्रांसोबत नको ते घडलं, 3 जणांचा करुण अंत, 6 जण कसेबसे वाचले
- 12.15 वाजता माजी आमदार संग्राम थोपटे आंदोलन स्थळी दाखल.मोर्चेकऱ्यांना संबोधित करून केस फास्ट ट्रॅकवर नेण्याचं आश्वासन.
- 12.20 ते 12:30 वाजता मांडेकरांनी फडणवीसांना दोनवेळा फोन लावण्याचा प्रयत्न केला. पण फोन लागला नाही.
- दुपारी 12:34 वाजता मंत्री आदिती तटकरेंना फोन लागला आणि आमदारांनी पुन्हा आश्वासन देऊन हायवे न रोखण्याचं आवाहन केलं.
- दुपारी 12:40 वाजता अखेर दोन्ही आमदारांच्या विनंती नंतर मोर्चा स्थगित.पण ग्रामस्थांचा संताप कायम
- दुपारी दीड वाजता रोहित पवार ग्रामस्थांच्या भेटीसाठी दाखल
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world