- अविनाश पवार, प्रतिनिधी
Pune News: पुण्यामध्ये दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे स्थानिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झालीय. नुकतेच पुण्यातील (Pune Crime News) रस्त्यावर दोन जिवलग मित्रांमध्ये भयानक भांडण झालं आणि या भांडणाचं रुपांतर जीवघेण्या हल्ल्यामध्ये झालं. जुन्या मैत्रिणीला फोन केल्याच्या कारणातून रक्तरंजित राडा येथे झाला. एका मित्राने दुसऱ्या मित्रावर कोयत्याने सपासप वार केले. या घटनेत तरुण गंभीर जखमी झालाय. ही धक्कादायक घटना पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरात 2 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडलीय. हा सर्व रक्तरंजित राडा सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केलाय. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ल्यात आदित्य कांबळे गंभीर जखमी झाला आहे. तर हल्ला करणारा मित्र फरार झालाय.
(नक्की वाचा: IIT Mumbai News: खळबळजनक! आयआयटी मुंबईमध्ये विद्यार्थ्याचा आढळला मृतदेह, प्रशासनाने उचललं गंभीर पाऊल)
पुण्यात नेमकं काय घडलं?
आदित्य कांबळे त्याच्या मित्रासोबत 2 फेब्रुवारी रोजी संध्याकाळच्या सुमारास भारती विद्यापीठ परिसरातील उसाच्या गाडीजवळ उभे होते. गप्पा मारताना जुन्या मैत्रिणीचा उल्लेख झाला आणि मैत्रिणीला फोन करण्यावरून दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झाली. दोघांमधील वाद विकोपाला गेले आणि मित्राने आदित्य कांबळेवर कोयत्याने सपासप वार करायला सुरुवात केली. या हल्ल्यात आदित्य गंभीररित्या जखमी झालाय. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झालीय. पुण्यातील भारतीय विद्यापीठ हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर औषधोपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडालीय. प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमी आदित्य कांबळेला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान या घटनेचा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय.
(नक्की वाचा: Nagpur News: नागपूर हादरलं! नात्यातीलच अल्पवयीन मुलांकडून मुलीवर सतत अत्याचार, 1098 क्रमांकामुळे काळं सत्य उघड)
तरुणावर कोयत्याने हल्ला, पाहा VIDEO
पुण्यात मैत्रिणीला फोन लावण्यावरुन दोन मित्रांमध्ये कडाक्याचं भांडण, कोयत्याने सपासप वार, हादरवणारा व्हिडीओ समोर #Punenews #Crimenews #Punecrimenews #police #CCTV pic.twitter.com/4Bagda53vr
— Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) February 4, 2026
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world