देवा राखुंडे, प्रतिनिधी
Pune Crime News Today : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील बालाजीनगर परिसरात बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी जवळपास 3 लाख 75 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे.स्वामी समर्थ अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक 03 मध्ये चोरी झाली आहे. सोमनाथ खाडे हे कुटुंबासह सोलापूर येथे गेले असताना चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.त्यानंतर घरातील लोखंडी लाकडी कपाटे उघडून सोन्याचे दागिने, चांदीचे साहित्य आणि 30 हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण 3 लाख 75 हजारांचा मुद्देमाल चोरी केला. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अज्ञात चोरट्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
नेमकं काय घडलं?
फिर्यादी सोमनाथ खाडे हे त्यांच्या कुटुंबासह दौंड तालुक्यातील बालाजी नगर परिसरातील स्वामी समर्थ अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक 3 मध्ये राहतात.सोमनाथ खाडे हे रायगड पोलीस दलात पोलीस हवालदार या पदावर नेमणुकीस आहेत.मात्र सध्या तात्पुरत्या स्वरूपात पोलीस प्रशिक्षण केंद्र सोलापूर येथे ते कार्यरत आहेत.
नक्की वाचा >> Pune News: पिंपरी-चिंचवडचे आयुक्त विजय सूर्यवंशी वादाच्या भोवऱ्यात, त्या विधानामुळे रान पेटलं, नेमकं काय घडलं?
22 मार्च 2026 रोजी सकाळी आठच्या सुमारास सोमनाथ खाडे हे त्यांच्या कुटुंबासह सोलापूर पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे गेले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या घराला टाळा लावला होता.27 मार्च 2026 रोजी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांना त्यांच्या शेजारी राहणाऱ्या कुटुंबीयांनी माहिती दिली की,त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप दिसत नसून दरवाजा उघडा आहे.
घरात अज्ञात चोरट्याने चोरी केली अन्..
यानंतर फिर्यादी सोमनाथ खाडे त्यांच्या कुटुंबीयांसह रात्री बाराच्या सुमारास दौंड मधील स्वामी समर्थ अपार्टमेंट मध्ये त्यांच्या फ्लॅट क्रमांक तीन या ठिकाणी घरी पोहोचले.त्यांनी घराची पाहणी केली असता त्यांना घरातील लाकडी आणि लोखंडी कपाटाचे दरवाजे उघडे दिसले. जमिनीवर काही कपडे अस्ताव्यस्त पडलेली होती आणि त्यानंतर त्यांच्या लक्षात आले की आपल्या घरात अज्ञात चोरट्याने चोरी केली आहे.त्यानंतर त्यांनी संबंधित घटनेसंदर्भात दौंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
नक्की वाचा >> Pune News: पुण्यात भर पावसात विद्यार्थ्यांचं आंदोलन, 'या' कॉलेजमधील हॉस्टेलबाबत गंभीर तक्रारी, मुलीही त्रस्त
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world