जाहिरात
Story ProgressBack

पुणे हादरलं! नामांकित महाविद्यालयाच्या वसतिगृहात विद्यार्थिनीची आत्महत्या

या प्रकरणी वसतिगृहातील कॅन्टीनमध्ये काम करणारा कर्मचारी सतीश जाधव आणि वसतिगृहात राहणारी विद्यार्थिनी मुस्कान सिद्धू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Time: 2 min
पुणे हादरलं! नामांकित महाविद्यालयाच्या वसतिगृहात विद्यार्थिनीची आत्महत्या
पुणे:

पुणे : पुण्यातील नामांकित (Pune Crime News) महाविद्यालयाच्या वसतिगृहात एका विद्यार्थिनीने स्वत:ला पेटवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार (Shocking News) समोर आला आहे. वसतिगृहातील कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याकडून वारंवार होणाऱ्या छेडछाडीला आणि रुममेटच्या जाचाला कंटाळून तरुणीने टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती आहे. 7 मार्च रोजी पुण्यातील प्रसिद्ध अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (Pune College of Engineering ) वसतिगृहात हा प्रकार घडला. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेनंतर विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. रेणुका बालाजी साळुंके (वय 19) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचं नाव आहे. या प्रकरणी वसतिगृहातील कॅन्टीनमध्ये काम करणारा कर्मचारी सतीश जाधव आणि वसतिगृहात राहणारी विद्यार्थिनी मुस्कान सिद्धू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेणुका ही पुण्यात एका अभियांत्रिकी  महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहत होती. वसतिगृहातील कॅन्टीनमधील कर्मचारी सतीश हा रेणुकाला अश्लील मेसेज करीत होता. या सर्व प्रकारामुळे रेणुका भीतीच्या छायेत होती. याशिवाय वसतिगृहातील तिच्या रूममध्ये राहणारी मुस्कान ही देखील रेणुकाला अभ्यास करण्यात व्यत्यत आणायची आणि जाणून बुजून त्रास देत होती, अशीही माहिती सांगितली जात आहे. या दोघांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून रेणुकाने 7 मार्चच्या रात्री वसतिगृहाच्या स्वच्छतागृहात स्वतःला पेटवून घेतले. पुण्यातील सूर्या हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

'आयलव्हयू'चे मेसेज करायचा...
रेणुका साळुंखे ही ज्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहत होती, त्याच वसतिगृहात काम करणारा सतिश जाधव नावाचा कर्मचारी रेणुकाला सतत आय लव्ह यूचे मेसेज करायचा. रेणुका समोर दिसताच तू इतकी बिझी झालीस का? मी किती मेसेज केले, असे म्हणत त्रास देत होता. या प्रकारामुळे रेणुका घाबरली होती. यात तिच्या खोलीत राहणारी मुलगीही तिला अभ्यास करू देत नव्हती, अशी माहिती सांगितली जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination