
Pune News : पुण्यातील आंबेगाव बुद्रुक पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका महिलेने सहा वर्षीय चिमूरड्यासह इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली. बुधवारी (18 जून) संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. आंबेगाव बुद्रुक परिसरातील कल्पक सोसायटीतमधील ही घटना आहे, अशी माहिती आहे. मयुरी देशमुख असे उडी मारलेल्या महिलेचे नाव आहे. मयुरीनं तिच्या सहा महिन्याच्या चिमूरड्याला घेऊन तिने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
प्राथमिक माहितीनुसार, आंबेगाव बुद्रुक परिसरातील कल्पक सोसायटी देशमुख दाम्पत्य राहतात. आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मयुरी सहा वर्षाच्या चिमूरद्यासह टेरेसवर गेली. आणि तिने तिथून खाली उडी मारली. उंचावरून पडल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच आंबेगाव बुद्रुक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दोघांचेही मृतदेह रुग्णालयात घेण्यात आले.
( नक्की वाचा : Jejuri Accident : जेजुरीजवळ कार आणि टेम्पोचा भीषण अपघात, 8 जणांचा जागीच मृत्यू )
दरम्यान, इमारतीवरून उडी मारण्याआधी मयुरीने लिहिलेली चिट्ठी पोलिसांना सापडली आहे. ज्यामध्ये ननंदेच्या त्रासाला कंटाळून उडी मारत असल्याचे लिहिल्याची माहिती आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world