Pune News: धक्कादायक! पैज लावून पाजली जास्त दारू, तरुणाचा जागीच मृत्यू; पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेहासोबत...

Pune News: जास्त प्रमाणात दारू पिण्याची पैज तरुणाच्या जीवावर बेतली.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Pune News: तरुणाला जास्त प्रमाणात दारू पाजली, मग्..."
Canva

Pune News: पैज लावून जास्त प्रमाणात दारू पाजणं एका तरुणाच्या जीवावर बेतलंय. या घटनेत तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. ही घटना मंगळवारी (30 डिसेंबर 2025) दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास नवलाख उंब्रे येथील एका शेतात घडल्याची माहिती समोर आलीय. रामकुमार साह असे मृत पावलेल्या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी कृष्णा सिंह आणि विकास कुमार या दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

मृतदेहासोबत काय केले?

यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी दोघांनी तरुणाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आलाय. याप्रकरणी कृष्णा सिंहला अटक करण्यात आलीय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी मृत रामकुमार साह याला पैज लावून एकाच वेळी जास्त प्रमाणात दारू पिण्यास भाग पाडले. जास्त दारू प्यायल्याने त्याची प्रकृती बिघडली.

(नक्की वाचा: Pune News: पुण्यात हॉटेलमध्ये 26 वर्षीय पोलिसाचा आढळला मृतदेह, 2 वर्षापूर्वीच पोलीस दलात भरती, धक्कादायक कारण समोर)

पुरावे नष्ट करण्यासाठी काय केले?

दुसरीकडे त्याला योग्य वेळेत वैद्यकीय उपचार मिळाले नाहीत, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. हादरवणारी बाब म्हणजे संशयितांनी गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाची विल्हेवाट लावली.

Advertisement

(नक्की वाचा: Pune News: 17 वर्षांच्या मुलाच्या हत्येनं पुण्यात खळबळ; आधी मुलीच्या मदतीने अपहरण, मग दगड-कोयत्याने केले वार)

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालीय. प्रकरणाचा तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांनी दिलंय.