Pune News : तब्बल 27 तास तरुणाचा छळ; बापाच्या सतर्कतेमुळे मोठा बनाव उघड, नागरिकांना अलर्ट करणारं पुणे प्रकरण

एका ज्येष्ठ नागरिकाने दाखवलेल्या प्रसंगावधानाने सायबर चोरट्यांचा हा डाव फसला.

जाहिरात
Read Time: 2 mins

सुरज कसबे, प्रतिनिधी

Pune News : मुंबई पोलिसांचे अधिकारी असल्याचं भासवून एका तरुणाला तब्बल २७ तास डिजिटल अरेस्ट करून त्याची १२ लाख रुपयांची फसवणूक करण्याचा प्रयत्न पिंपरी-चिंचवड पोलिसांनी हाणून पाडला आहे. एका ज्येष्ठ नागरिकाने दाखवलेल्या प्रसंगावधानाने सायबर चोरट्यांचा हा डाव फसला.

स्काईप कॉलद्वारे डिजिटल अरेस्ट...

निगडी परिसरातील एका तरुणाला सायबर गुन्हेगारांनी व्हॉट्सअ‍ॅप कॉल केला. तुमच्या नावाच्या पार्सलमध्ये पासपोर्ट आणि एमडी ड्रग्ज सापडले आहेत, अशी भीती घालून त्याला स्काईप कॉलद्वारे डिजिटल अरेस्ट करण्यात आले. आरोपींनी त्याच्याकडून बँक खाते आणि Aadhaar Redacted ची माहिती मिळवली. त्यानंतर या प्रकरणातून सुटका करण्यासाठी क्लिअरन्स सर्टिफिकेट देण्याच्या नावाखाली १२ लाख रुपयांची मागणी करण्यात आली. घाबरलेल्या तरुणाने म्युच्युअल फंड मोडून १२ लाख रुपये जमा करण्याची तयारी केली होती.

Advertisement

नक्की वाचा - Mumbai News : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक तात्पुरत्या काळासाठी बंद; 2 दिवस प्रवासाचं नियोजन करा!

मात्र, त्याने ही सर्व माहिती आपल्या वडिलांना दिली. वडिलांना यात संशय आल्याने त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी मध्यस्थी करत ही फसवणूक वेळीच रोखली. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा कोणत्याही संशयास्पद कॉलला बळी पडू नका. कोणताही सरकारी विभाग अशा प्रकारे पैशांची मागणी करत नाही. शंका आल्यास त्वरित जवळच्या पोलीस स्टेशन किंवा सायबर सेलशी संपर्क साधावा.

Topics mentioned in this article