अविनाश पवार, प्रतिनिधी
Pune Crime News : पुणे शहरातील विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा विमानतळ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकत ही कारवाई केली. पोलिसांनी पाच तरुणींची सुटका केली असून मुख्य आरोपी मेहबूब खानला अटक करण्यात आली आहे.आरोपीने पैशांचे आमिष दाखवून तरुणींना वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त केल्याचं प्राथमिक तपासात उघडकीस आलं आहे.
आरोपी मेहबुब खानने पैशांचं आमिष दाखवलं आणि..
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरात स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. आरोपी मेहबूब खान पैशांचं आमिष दाखवून तरुणींना वेश्या व्यवसायात काम करण्यास प्रवृत्त करायचा, अशी माहिती तपासात उघड झाली आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी नियोजनबद्धरीत्या छापा संबंधित स्पा सेंटरमध्ये सुरू असलेला बेकायदेशीर प्रकार उघडकीस आणला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास विमानतळ पोलीस करत आहेत. शहरात स्पा सेंटरच्या आड सुरू असलेल्या बेकायदेशीर व्यवसायांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
नक्की वाचा >> गावात वृक्षारोपण करणाऱ्या महिला सरपंचाची ओढणी खेचली..शिविगाळ करून मारहाण केली, संतापजनक व्हिडीओ व्हायरल
इथे पाहा स्पा सेंटरचा धक्कादायक व्हिडीओ
कल्याणी नगर परिसरात विमानतळाचा भाग आहे. या भागांमध्ये अनेक स्पा सेंटर आणि बार सुरु आहेत. नाईट पार्ट्यांसोबतच इथे जे क्लब आहेत, त्यांना स्थानिक लोकांचा तीव्र विरोध आहे. गतवर्षी पोर्षे कारचा अपघातही याच ठिकाणी झाला होता. त्यानंतर या परिसरातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात होती. अशातच याच परिसरात आता सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.