जाहिरात

Pune Crime News : नातीसारख्या चिमुरड्यांवर पडली नराधमाची नजर, चॉकेलटेचं आमिष दाखवून घरी बोलावलं आणि...

Pune Crime News : नातीसारख्या चिमुरड्यांवर पडली नराधमाची नजर, चॉकेलटेचं आमिष दाखवून घरी बोलावलं आणि...
राजगुरुनगर, पुणे:

अविनाश पवार, प्रतिनिधी

Pune Rajgurunagar 2 Sisters Killed incident : पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर शहरांमधील दोन अल्पवयीन सख्या बहिणींच्या हत्येनं संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातला शव तपासणी अहवाल पोलिसांच्या हाती आलाय. त्यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. या चिमुरड्यांचे तोंड पाण्याच्या ड्रममध्ये बुडवण्यात आले. त्यानंतर श्वास गुदरमल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचं या तपासात स्पष्ट झालं आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

नेमकं काय घडलं?

या दोन अल्पवयीन मुलींचे आई-वडील हे कामगार आहेत यांचे वडील हे सफाई कामगार म्हणून काम करतात तर आई ही मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवत होते. राजगुरुनगर शहरातच वाडा रोड परिसरात असणाऱ्या एका छोट्याशा चाळीत हे कुटुंब राहत होते.

या कुटुंबाच्या घराच्या वरच्या बाजूलाच हा अजय दास नावाचा 54 वर्षांचा व्यक्ती राहत होता. अजय एका हॉटेलमध्ये आचाऱ्याचं काम करत होता. ही घटना घडली त्या दिवशी पीडित मुलींचे आई-वडील कामावर गेले होते. या दोन मुली घराच्या अंगणात खेळत होत्या. 

( नक्की वाचा : Kalyan Marathi Man Attack : अखिलेश शुक्लाच्या अडचणीत वाढ, कोर्टाच्या आवारात झाला वकिलाशी वाद )
 

अजय दाससोबत राहणारे अन्य वेटर्स लग्नाच्या निमित्तानं बाहेर गेले होते. त्यामुळे तो घरात एकटाच होता. त्याने या मुलींना चॉकलेटचे आमिष दाखवून घरी बोलावले. त्यानं या बहिणींमधील नऊ वर्षांच्या मुलीला बाथरुममध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिच्या लहान बहिणीने आरडाओरड करायला सुरुवात केली. आजूबाजूच्या शेजाऱ्यांना नाही कळू नये म्हणून अजय दासने  या मुलीच्या डोक्यात पाईप हाणला. या हल्ल्यानं ती बेशुद्ध पडली. त्यानंतर त्याने त्या घरातच असलेल्या ड्रममध्ये लहान मुलीचे तोंड बुडवून तिला ठार मारले आणि त्याच ड्रममध्ये टाकून दिले 

 ही घटना पाहात असलेल्या तिच्या मोठ्या बहिणीने देखील अत्याचार करण्याच्या इराद्याने जवळ आलेल्या अजयला पाहून आरडाओरड करायला सुरुवात केली. त्यामुळे अजयने तिला देखील ड्रममध्ये बुडवले आणि ठार मारले. या दोन्ही मुलींचे मृतदेह ड्रममध्ये टाकून त्यावर कपडा झाकून हा अजय दास तेथून बाहेर निघून गेला.संध्याकाळी या मुलींचे आई-वडील आले असताना त्यांना आपल्या मुली आढळून आल्या नाहीत त्यामुळे त्यांनी आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला मात्र त्या कुठेच आढळून न आल्याने त्यांनी खेड पोलीस स्टेशनमध्ये जाऊन अपहरणाचा गुन्हा दाखल केला.

( नक्की वाचा : संभाजीनगरमध्ये स्पेशल 26 सारखा प्रकार, सैन्य भरती निघाली बनावट, पोलीस मुख्यालयाजवळच झाली चाचणी )
 

खेड पोलिसांना देखील ज्यावेळी ही माहिती मिळाली त्यानंतर जवळच्या परिसरात पाहणी केली. यावेळी संशयातून त्यांनी त्या घराच्य वर असणाऱ्या घराची झेडपी घेतली असता त्यांना ड्रममध्ये या दोन्ही  मुली आढळून आल्या त्यांना ताबडतोब दवाखान्यात नेले. मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com