जाहिरात

Pune Sagar Moholkar death :थेट तोंडात गोळी, शरीरात 4 गोळ्या अडकलेल्या; कुख्यात गुंडाचा पुण्यात तडफडून The End!

जखमी पैलवान सागर मोहोळकर याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Pune Sagar Moholkar death :थेट तोंडात गोळी, शरीरात 4 गोळ्या अडकलेल्या; कुख्यात गुंडाचा पुण्यात तडफडून The End!

यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी

Sagar Moholkar death : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी अहिल्यानगर जामखेडमध्ये पैलवान सागर मोहोळकरवर गोळीबाराची घटना घडली होती. गोळीबार झालेला पैलवान सागर मोहोळकर याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. (Sagar Moholkar death)

जखमी पैलवान सागर मोहोळकर याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये पैलवान सागर मोहोळकर याच्यावर गोळीबार झाल्याची घटना 9 मार्च रोजी घडली होती. त्याच्या तोंडातही गोळी लागल्याची माहिती होती. त्याच्यावर जवळून गोळीबार करण्यात आला होता. त्याच्या शरीरात सहा गोळ्या लागल्या होत्या. मात्र चार गोळ्या शरीरातून बाहेर काढण्यात वैद्यकीय अडचणी येत असल्याची माहिती आहे. गुंड मोहोळकर याच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू होते.

गुंड निलेश घायवळ कनेक्शनचाही तपास

मोहोळकर याच्यावर गोळीबार झाल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात पोलिसांनी पुण्यातून एकाला ताब्यात घेतलं. आरोपी पुण्याचा रहिवासी असून पोलिसांकडून गुंड निलेश घायवळ कनेक्शनचाही तपास होणार असल्याचे सांगण्यात आलं आहे. पैलवान सागर मोहोळकरवर गोळीबार करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेला आरोपी पुण्याचा आहे. त्याची कसून चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आलं आहे.

नक्की वाचा - Beed News : आदिनाथ महाराजांना कोण त्रास देत होतं? गुप्तांगांवर वार केल्याप्रकरणी शिष्याची धक्कादायक माहिती

मोहोळकर चर्चेत का आला?

नगरच्या जामखेड शहरात पैलवान सागर मोहोळकर याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या घटनेनंतर पोलिसांनी जखमीला उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल केलं होतं. या घटनेचा तपास सुरू केला होता. सागर मोहळकर याने कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या कानाखाली मारल्याची घटना धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात एका जत्रेदरम्यान घडली होती. तेव्हापासून सागर मोहोळकर हा चांगलाच चर्चेत आला होता. तसेच त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून त्यानुसार नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला होता.

अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने जामखेड येथील अभिमन्यू याला ताब्यात घेऊन चौकशी केली. यामध्ये गोळीबार करणाऱ्या पुणे येथील चार्ली उर्फ माऊली उर्फ ज्ञानेश्वर साठे, रोहित विठ्ठल आखाडे, चिन्या (पूर्ण नाव माहित नाही) या आरोपींनी गोळीबार केल्याची माहिती असून यामध्ये दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com