जाहिरात

Pune Crime: जन्मदात्यांनीच केला पोटच्या लेकीचा सौदा! अवघ्या 40 दिवसाच्या बाळाला विकलं; पुण्यात खळबळ

Pune Crime News: सुरुवातीला आमची मुलगी पळून नेली आहे अशी तक्रार द्यायला हे आई-वडील आले होते. त्यानंतर आई-वडिलांनीच विक्री केल्याचे समोर आला आहे.

Pune Crime: जन्मदात्यांनीच केला पोटच्या लेकीचा सौदा! अवघ्या 40 दिवसाच्या बाळाला विकलं; पुण्यात खळबळ

रेवती हिंगवे, पुणे: विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातून एक संतापनजक घटना समोर आली आहे. आई वडिलांनी 40 दिवसांच्या मुलीची साडेतीन लाख रुपयांत विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आई-वडिलांसह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. 

Govandi Crime: मित्राला कोल्ड्रिंकमधून विष दिलं, संशय येऊ नये म्हणून स्वतःही प्यायला, पोलीस तपासात भयंकर प्लॅन उघड

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  पुण्यात पैशांसाठी आई वडिलांनी 40 दिवसांच्या मुलीची साडेतीन लाख रुपयांत विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी आई वडिलांसह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. मीनल ओंकार सपकाळ, ओंकार औदुंबर सपकाळ (वय, 29 रा. बिबवेवाडी), साहिल अफजल बागवान (वय 27, रा. सातारा), रेश्मा शंकर पानसरे (वय 34, रा. येरवडा), सचिन रामा अवताडे (वय 44, रा. येरवडा) आणि दीपाली विकास फटांगरे (वय 32, रा. संगमनेर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

Crime News: संतापजनक! कॉम्प्युटर क्लासेस चालकाकडून महिला सहकाऱ्याचा विनयभंग

आईवडिलांनी मुलीची साडेतीन लाखामध्ये विक्री केली होती. मात्र मध्यस्थीने दोन लाख रुपये दिल्याने मध्यस्थी आणि विक्री करणाऱ्या आई-वडिलांमध्ये वाद झाला आणि त्यामुळे प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मध्यस्थीने फसवणूक केल्यानंतर माता-पित्यांनी पोलिसात धाव घेतली.  सुरुवातीला आमची मुलगी पळून नेली आहे अशी तक्रार द्यायला हे आई-वडील आले होते. त्यानंतर आई-वडिलांनीच विक्री केल्याचे समोर आला आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com