जाहिरात

Raja Raghuvanshi Murder Case: सोनम रघुवंशीचा बॉयफ्रेंड राज किती श्रीमंत? पगार ऐकून बसेल धक्का

पोलीस चौकशीदरम्यान राजा रघुवंशी हत्या प्रकरणातील कित्येक धक्कादायक गोष्टी समोर येत आहे. सोनम रघुवंशीसह राज कुशवाह देखील पोलिसांच्या ताब्यात आहे. पण खरंच हे सारे काही केवळ प्रेमापोटी करण्यात आले का? असा प्रश्न निर्माण होतोय.

Raja Raghuvanshi Murder Case: सोनम रघुवंशीचा बॉयफ्रेंड राज किती श्रीमंत? पगार ऐकून बसेल धक्का
सोनम रघुवंशी हत्या प्रकरणात नवी माहिती समोर

Raja Raghuvanshi Murder Case: राजा रघुवंशी हत्या प्रकरण, एक असे हत्याकांड (Raja Raghuvanshi Murder Case) ज्यामुळे देशभरात खळबळ उडालीय. सोनम रघुवंशी जी ऐशोआरामाचे जीवन जगत होती, तिच्या पतीची कमाई देखील लाखो रुपयांच्या घरात होती आणि कथित स्वरुपातील प्रियकर राज कुशवाह ज्याचा पगार जेमतेम 15-20 हजार रुपये असेल. याच कथित प्रियकरासाठी सोनमने पतीविरोधात भयंकर कट रचला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

बॉयफ्रेंड राजसोबत सोनम तास-न्-तास गप्पा मारायची  

इंदुर शहरातील या प्रकरणामध्ये दिवसेंदिवस समोर येणाऱ्या नवनवीन गोष्टी अंगावर शहारे आणणाऱ्या आहेत. पोलिसांनी चार आरोपींना अटक केलीय. सोनमने स्वतःच तिचा पती राजाची हत्या करण्यासाठी कट रचला होता. या कटामध्ये तिचा कथित बॉयफ्रेंड राज कुशवाहचाही समावेश होता, ज्याच्यासोबत सोनम तास-न्-तास गप्पा मारायची. 

Raja Raghuvanshi Murder Case : राजाशी लग्न ठरवलं, सोनमने आईला धमकी दिली; तेव्हाच सांगितला होता प्लॅन

(नक्की वाचा: Raja Raghuvanshi Murder Case : राजाशी लग्न ठरवलं, सोनमने आईला धमकी दिली; तेव्हाच सांगितला होता प्लॅन)

राज कुशवाह आणि सोनमची भेट कशी-कुठे झाली? 

राज कुशवाह नेमका कोण आहे? त्याची आणि सोनमची भेट कशी तसेच कुठे झाली? 15-20 हजार रुपये कमावणाऱ्या राजमध्ये असे नेमके काय होते, ज्यासाठी सोनमने संपूर्ण आयुष्य पणाला लावले. सोनमच्या वडिलांकडे राज काम करत होता. यादरम्यानच त्याची आणि सोनमची भेट झाली. यानंतर दोघांमध्ये प्रेमाचे नाते तयार झाले, अशी माहिती समोर आलीय. 

सोनमचा बॉयफ्रेंड किती रुपये कमावत होता? 

राजचा पगार किती होता? तर जेमतेम 15 ते 20 हजार रुपये. वार्षिक उत्पन्न दोन लाख रुपये देखील नाही. ना मोठे घर, ना व्यवसायाची पार्श्वभूमी. तरीही सोनमचे त्याच्यावर प्रेम होते आणि या प्रेमासाठी तिने पती राजा रघुवंशीची हत्या केली.

सोनमनं 'मंगळ दोष' दूर करण्यासाठी हत्या केली? राजाच्या वडिलांचा गंभीर आरोप, म्हणाले...

(नक्की वाचा: सोनमनं 'मंगळ दोष' दूर करण्यासाठी हत्या केली? राजाच्या वडिलांचा गंभीर आरोप, म्हणाले...)

बॉयफ्रेंडसोबत मिळून पतीची केली हत्या  

राजा रघुवंशीचा ट्रान्सपोर्टशी संबंधित व्यवसाय होता. इंदुर शहरामध्ये त्याचे स्वतःचे घर होते आणि लाखो रुपयांचा त्याचा व्यवसाय होता. सोनम-राजाचे लग्नही थाटामाटात झाले होते. पण लग्नाच्या केवळ सहा दिवसांनंतर सोनमने पतीचा काटा काढण्यासाठी मोठा कट रचल्याचा आरोप केला जातोय. राजाला हनिमूनच्या बहाण्याने सोनम मेघालयामध्ये घेऊन गेली, असाही आरोप आहे. जेथे तिच्या कथित प्रियकरासोबत तीन साथीदार आधीच पोहोचले होते. पतीच्या हत्येसाठी सोनमने कॉन्ट्रॅक्ट किलरची मदत घेतली, हा देखील आरोप आहे. शिलाँगच्या खोऱ्यात जेथे प्रेम फुलते तेथेच राजाची हत्या करण्यात आली. राजाच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करुन हत्या करण्यात आली. नंतर सोनमने स्वतःचं अपहरण झाल्याचाही बनाव केला. 

प्रेमासाठी पतीची हत्या की आणखी काही वेगळेच?

पोलीस चौकशीदरम्यान राजा रघुवंशी हत्या प्रकरणाशी संबंधित दररोज एक-एक भयानक गोष्टी समोर येत आहेत, ज्या एखाद्या सिनेमाच्या पटकथेसारख्या भासत आहेत. सोनमसह राज कुशवाह आता पोलिसांच्या ताब्यात आहे. पण सर्वात मोठा प्रश्न अनुत्तरित आहे की हे सर्व काही खरंच प्रेमासाठी करण्यात आले होते का? की या प्रेमामागे भलतंच रहस्य लपलंय? या दिशेने प्रकरणाचा तपास सुरू आहे.  

Listen to the latest songs, only on JioSaavn.com