जाहिरात

पोक्सोचा गंभीर गुन्हा, त्याचीच महिलांच्या कबड्डी प्रशिक्षकपदी नियुक्ती; क्रीडा प्रेमींमध्ये संतापाची लाट

ज्या व्यक्तीविरोधात आधीच अल्पवयीन विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे, त्याची महिलांच्या कबड्डी संघाच्या प्रशिक्षकपदावर नियुक्ती कशी करता येऊ शकते?

पोक्सोचा गंभीर गुन्हा, त्याचीच महिलांच्या कबड्डी प्रशिक्षकपदी नियुक्ती; क्रीडा प्रेमींमध्ये संतापाची लाट

Pune Crime : बाल लैंगिक अत्याचारासारखा (पोक्सो) गंभीर गुन्हा दाखल असलेल्या शिक्षकाची महिलांच्या कबड्डी प्रशिक्षक पदी नियुक्ती करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवड कबड्डी विभागात घडला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अल्पवयीन विद्यार्थिनींच लैंगिक शोषण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या कबड्डी क्रीडा प्रशिक्षक राजेंद्र गुलाब पानसरे यांची ठाणे जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद कबड्डी निवड चाचणी स्पर्धेसाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही बाब समोर आल्यानंतर राज्यातील क्रीडा प्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे राजेंद्र गुलाब पानसरे यांच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्या सारखा अतिशय गंभीर गुन्हा दाखल असताना देखील पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनने राजेंद्र गुलाब पानसरे यांची महिला कबड्डी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

Baramati Bribe : अजित पवारांच्या बारामतीतील नगरपरिषदेचा अधिकारीच भ्रष्ट; लाच घेताला रंगेहात सापडला!

नक्की वाचा - Baramati Bribe : अजित पवारांच्या बारामतीतील नगरपरिषदेचा अधिकारीच भ्रष्ट; लाच घेताला रंगेहात सापडला!

19  ते  23 मार्च दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात वरिष्ठ गट राज्य अजिंक्य पद कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या पिंपरी चिंचवड विभाग महिला कबड्डी संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी राजेंद्र गुलाब पानसरे यांची नियुक्ती करण्यात आल्याने राज्यातील क्रीडा प्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. आपल्या विद्यालयात शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थीनीचा लैंगिक छळ केल्या प्रकरणी राजेंद्र गुलाब पानसरे यांच्यावर पुणे जिल्ह्यातील घोडेगाव पोलीस स्टेशनमध्ये बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअन्वये गुन्हा दाखल आहे. असं असताना देखील स्वच्छ प्रतिमेच्या क्रीडा प्रशिक्षकाऐवजी राजेंद्र गुलाब पानसरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे राजेंद्र गुलाब पानसरे यांची हकालपट्टी करून त्यांची नियुक्ती करणाऱ्या कबड्डी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांवरही पॉस्कोचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी राज्यातील क्रीडा प्रेमींनी केली आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: