
Ganesh Visarjan Miravnuk 2025 : अनंत चतुर्दशीला (Anant Chaturdashi 2025) मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. अनंत चतुर्दशी (6 सप्टेंबर) मुंबई आणि उपनगरात पावसाचं सावट होतं. मात्र अशाही परिस्थितीत गणेश भक्तांचा उत्साह कमी झाला नाही. दहा दिवस बाप्पाती मनोभावे पूजा केल्यानंतर 6 सप्टेंबरला बाप्पाला निरोप देण्यात आला. यादरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
गणेशाची मूर्ती विसर्जनासाठी घेऊन जात असताना विजेचा धक्का लागल्याने एका तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर 5 जण जखमी आहेत. मुंबईतील साकिनाका परिसरात ही घटना घडली. रस्त्यावर लटकलेल्या वायर गणपतीच्या मिरवणुकीच्या ट्रॉलीला लागल्याने ही दुर्घटना घडली आहे.
नेमकं काय घडलं?
मुंबईच्या साकीनाका (Sakinaka Electric Shock) परिसरात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत विजेचा धक्का लागून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. खैराणी रोडवरील श्री गजानन मित्र मंडळाची मिरवणूक सुरू असताना मिरवणुकीच्या ट्रॉलीला लटकलेल्या 11 हजार व्होल्टेजच्या हाय टेन्शन वायरचा स्पर्श झाला. यात बिनू शिवकुमार (वय ३६) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर तुषार गुप्ता (18), धर्मराज गुप्ता (44), आरुष गुप्ता (12), शंभू कामी (20) आणि करण कानोजिया (14) असे पाच जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली असून, टाटा पॉवर कंपनीची वायर मिरवणुकीच्या ट्रॉलीला लागल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.
नक्की वाचा - Lalbaugcha Raja Visarjan :8 किमीसाठी 20 तास; 'या' 5 परंपरांमुळे लालबागच्या राजाच्या विसर्जनाला लागतो इतका वेळ
Mumbai | Shocking News | साकीनाका येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत विजेच्या धक्क्याने एका तरुणाचा मृत्यू ....| NDTV मराठी
— NDTV Marathi (@NDTVMarathi) September 7, 2025
मुंबईच्या साकीनाका येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत विजेच्या धक्क्याने एका तरुणाचा मृत्यू झाला असून, पाच जण जखमी झाले आहेत. मिरवणुकीच्या ट्रॉलीला लटकलेल्या हाय टेन्शन… pic.twitter.com/nY9nwIsmzr
अमरावती जिल्ह्यात गणपती विसर्जनाला गालबोट, 3 भाविकांचा मृत्यू
बाप्पाला निरोप देताना नदीत बुडून वेगवेगळ्या घटनेत तिघांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. दर्यापूर शहरातील चंद्रभागा नदीपात्रात गणपती विसर्जनासाठी 32 वर्षीय तरुणी मुक्ता श्रीनाथ या तरुणीचा खोल पाण्यात गेल्याने मृत्यू झाला.
दुसऱ्या घटनेत धामणगाव रेल्वे तालुक्यातील वाघोली येथे 22 वर्षीय युवक करण चव्हाण गणपती विसर्जनच्या वेळी त्याचा पाय घसरला आणि तो पाण्यात पडला आणि पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला.
तर तिसऱ्या घटनेत मेळघाटमध्ये धूळघाट रोडवर गडगा नदी पात्रात गणेश विसर्जनावेळी अनिल माकोडे हा युवक वाहून गेला, या तिन्ही घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे अमरावती जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world