जाहिरात

Sangli News: 'बायकोला घरात का घेत नाहीस?' सासू-सुनेच्या वादात आईचा बळी; सांगलीत मुलाने जन्मदात्या आईला संपवलं

Sangli News: सांगलीच्या मानमोडी येथे पत्नीला घरात ठेवण्यावरून झालेल्या वादातून तरुणाने आपल्या 51 वर्षीय आईची हत्या केली.

Sangli News: 'बायकोला घरात का घेत नाहीस?' सासू-सुनेच्या वादात आईचा बळी; सांगलीत मुलाने जन्मदात्या आईला संपवलं
"Sangli News: सांगली हादरली! पोटच्या मुलाने आईला संपवलं"
NDTV Marathi

- शरद सातपुते, प्रतिनिधी

Sangli News: पत्नीला घरात का ठेवून घेत नाहीस? या क्षुल्लक वाटणाऱ्या वादाचे रुपांतर एका क्रूर हत्येत झाल्याची घटना सांगली जिल्ह्यातील मानमोडी येथे घडली आहे. मुलाने रागाच्या भरात आपल्या 51 वर्षीय आईचे नाक, तोंड आणि गळा दाबून निर्घृण हत्या केली. याप्रकरणी कुपवाड पोलिसांनी आरोपी मुलाला बेड्या ठोकल्या आहेत.

(नक्की वाचा: Sindhudurg News: 'सिंधुदुर्गचं नुकसानच आहे...'शक्तीपीठ महामार्गाच्या नव्या नकाशावरून माजी आमदाराचा खळबळजनक दावा)

मुलाने आईच्या केलेल्या हत्येमुळे सांगली हादरली

मानमोडी येथील झेंडे मळा परिसरात राहणारा जगदीश जीवन झेंडे (वय 28 वर्षे) याचे आपल्या आई संगीता जीवन झेंडे (वय 52वर्षे) सतत भांडण होत असे. जगदिशची पत्नी सोनाली हिला घरात नांदवून घेण्यास संगीता यांचा कडाडून विरोध होता. या गोष्टीचा राग मनात ठेवून जगदीशने 16 एप्रिल 2026 रोजी पहाटेच्या सुमारास घरात दुसरे कोणीही नसल्याच्या संधीचा फायदा घेतला आणि आईचे नाक,  तोंड, गळा दाबून तिचा जीव घेतला.

(नक्की वाचा: Trending News: जनगणना ड्युटी रद्द करण्यासाठी शिक्षकाने आणलं चक्क दिव्यांग प्रमाणपत्र, पण DMच्या 30 मिनिटांच्या निर्णयामुळे फुटला घाम अन्...)

पोलिसांची कारवाई

या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत पावलेल्या संगीता यांच्या भावाने याप्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. कौटुंबिक वादातून जन्मदात्या आईचा असा करुण अंत झाल्याने मानमोडी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com