जाहिरात

Sangli News : सांगलीच्या कृष्णाकाठी हिट अँड रनचा थरार, मद्यधुंद चालकाने 15 जणांना उडवलं, 6 पोलिसांचा समावेश

सांगलीच्या कृष्णाकाठी एका मद्यधुंद कार चालकाने 14-15 जणांना जोरदार धडक दिली.यामध्ये सहा पोलिसांचा आणि दोन लहान मुलांसह इतर नागरिकांचा समावेश आहे.

Sangli News : सांगलीच्या कृष्णाकाठी हिट अँड रनचा थरार, मद्यधुंद चालकाने 15 जणांना उडवलं, 6 पोलिसांचा समावेश
Sangli Accident News

शरद सातपुते, प्रतिनिधी

Sangli Accident News Today : सांगली कृष्णा नदीच्या काठावर सध्या कृष्णामाई नदी महोत्सव सुरू आहे. सांगली इस्लामपूर मार्गावर कृष्णा नदी परिसराच्या आवारात गेल्या 3 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गर्दी आणि वाहतूक वाढली आहे. आज कृष्णामाई महोत्सवाचा शेवट दिवस असल्याने सांगली शहरातील हजारो भावीक आरतीसाठी आले होते. टिळक चौकातूनच महोत्सवाला जाण्याची वाट आहे. याच ठिकाणी एका मद्यधुंद कार चालकाने 14-15 जणांना जोरदार धडक दिली.यामध्ये सहा पोलिसांचा आणि दोन लहान मुलांसह इतर नागरिकांचा समावेश आहे. जखमींना सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर मद्यधुंद चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

लोकांना धडक देऊन चालकाने पलायन केले पण नंतर..

मिळालेल्या माहितीनुसार, सांगली इस्लामपूर मार्गावर कृष्णा नदी परिसरात एका मद्यधुंद चालकाने हिट अँड रनचा धक्कादायक प्रकार केला. लोकांना धडक देऊन तो चालक त्या ठिकाणाहून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता.परंतु, नागरिकांनी त्याला पकडलं आणि चोप दिला. या अपघातात अनेक दुचाकींचेही मोठे नुकसान झाले आहे. 

नक्की वाचा >> Sangli News : गोपीचंद पडळकरांच्या समर्थकांकडून शिंदे गटाच्या गाड्यांची तोडफोड, सभेच्या ठिकाणी काय घडलं? Video

सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जखमींवर उपचार सुरु 

"सांगलीच्या टिळक चौकामध्ये आज सायंकाळच्या सुमारास एका मध्यधुंद वाहनचालकांनी हिट अँड रनचा थरार करत 14 ते 15 जणांना जखमी केले. या सर्व जखमींना सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.यामध्ये सहा पोलिसांचा समावेश आहे.यातील मध्यधुंद चालकास नागरिकांनी चोप देत पोलिसांच्या हवाली केले.घटनेनंतर सांगली सिव्हिल हॉस्पिटल मध्ये जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमींना कोणत्याही प्रकारची गंभीर दुखापत झाली नाही",अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

नक्की वाचा >>  'कागदपत्र कसे जळाले नाहीत? 5 जणांचा मृत्यू, सहावा व्यक्ती कुठे?', अजितदादांच्या सर्वात जवळच्या नेत्याला संशय

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com