जाहिरात

Beed News: बीड हत्या प्रकरण! पोलिसांकडून अंजली दमानियांना नोटीस; रुपाली ठोंबरेंवरही गुन्हा दाखल

अंजली दमानियाच्या वक्तव्यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत माहिती व पुरावे पोलिसांकडे सादर करावे, असं या पत्रामध्ये म्हटले आहे

Beed News: बीड हत्या प्रकरण! पोलिसांकडून अंजली दमानियांना नोटीस; रुपाली ठोंबरेंवरही गुन्हा दाखल

 स्वानंद पाटील, बीड:  बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातील फरार आरोपींचा खून झाला असून त्यांचे मृतदेह सापडल्याचा खळबळजनक दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता. यावरुनच आता स्थानिक गुन्हे शाखेने अंजली दमानिया यांना पत्र पाठवलं आहे. याबाबत पुरावे दाखवण्याचे आव्हान या पत्रामधून करण्यात आलं आहे. 

काय म्हणाल्या होत्या अंजली दमानिया? 

 'काल रात्री साडे अकरा मला एक फोन आला. त्यांनी सांगितलं की संतोष देशमुखचे आरोपी  कधीच सापडणार नाहीl कारण त्यांचे मृतदेह सापडले आहेत. त्या व्यक्तीने जागाही सांगितली. मी याबाबतचे कॉल रेकॉर्डिंग पोलिसांकडे पाठवले आहेत ते चौकशी करत आहेत. हे प्रकरण गंभीर असून मी हादरुन गेले आहे, असा खळबळजनक दावा अंजली दमानिया यांनी केला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

यावरुनच आता गुन्हे शाखेने त्यांना पत्र पाठवले आहे. अंजली दमानियाच्या वक्तव्यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत माहिती व पुरावे पोलिसांकडे सादर करावे, असं या पत्रामध्ये म्हटले आहे. याबाबत आता अंजली दमानिया यांनीही माहिती दिली असून सर्व कॉल डिटेल्स पोलिसांना दिल्याचं त्यांनी म्हटले आहे.

दुसरीकडे - बीड येथील मूक मोर्चा च्या पार्श्वभूमीवर आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नावाने एक व्हाट्सअप चॅट वायरल झाले होते.. या प्रकरणात आता बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रूपाली पाटील ठोंबरे यांच्यासह आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष मोहसिन शेख यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान, याबाबत जितेंद्र आव्हाड यांनीही पोलिसात तक्रार दाखल केली होती. माझे खोटे वाॅटसॲप चॅट वायरल करणाऱ्यांविरुद्ध काल रात्री मी बीडमधील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात रितसर गुन्हा (एफआयआर) दाखल केला. कर नाही और डर कशाला? असे म्हणत त्यांनी रुपाली ठोंबरे यांच्यावर निशाणा साधला होता.

( नक्की वाचा : Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या हाती पिस्तूल सोबत वाल्मिक कराड, दमानियांनी दाखवले Video )

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com