
Satara Crime : मेरठमध्ये मुस्कान रस्तोगी या तरुणीने प्रियकरासोबत मिळून आपल्या पतीची अत्यंत निघृणपणे हत्या केली. त्याने पतीच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि तुकडे घरातील ड्रममध्ये भरून सिमेंटने सिलबंद केलं. या घटनेने देश ढवळून निघाला आहे. पत्नीने दहा वर्षे सोबत असलेल्या पतीला अत्यंत निघृणपणे संपवलं. यानंतर साताऱ्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. साताऱ्यात एका प्रेयसीने प्लान आखून आपल्या प्रियकराची हत्या केली. ज्याने आपल्यावर जिवापाड प्रेम केलं त्याचीच केवळ पैशाच्या कारणावरुन हत्येचा कट आखला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या तरुणाची त्याच्याच प्रेयसीने खून केल्याची धक्कादायक घटना साताऱ्यातील नरवणे येथून समोर आली आहे. खून करण्यासाठी प्रेयसीला तिच्या आईसह सात जणांनी मदत केल्याचंही समोर आलं आहे. साताऱ्यातील माण तालुक्यातील गोंदवले बुद्रूक येथील योगेश पवार याचे रोशनी माने हिच्या सोबत प्रेमसंबध होते. या प्रेमसंबधातून प्रेयसी रोहनी माने हिने योगेशकडून उसने पैसे घेतले होते. रोशनीने पैसे परत करायचे आहेत असे सांगून योगेशला नरवणे गावात बोलवून घेतले. नंतर त्याचा इतर साथिदारांच्या मदतीने खून केला.
नक्की वाचा - Nagpur Violence : नागपूर हिंसाचारातील आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवणार? फहीम खानला मनपाकडून नोटीस
योगेशचा मृतदेह कारच्या डिक्कीत टाकून ही कार सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथील कॕनोलमध्ये ढकलून दिली. कॕनोलमध्ये कार पडल्याची गावभरात चर्चा सुरू झाली. शेवटी क्रेनने कार बाहेर काढण्यात आली, तेव्हा हातपाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. यानंतर या संपूर्ण घटनेचा उलघडा झाला. यात पोलिसांनी प्रेयसी रोशनी, तिची आई पार्वती आणि इतर दोघांना अटक करण्यात आली आहे. तर यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचाही सहभाग असल्याचं समोर आलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world