जाहिरात

Satara Doctor Case: लक्ष्मी पूजनाला महिला डॉक्टर आणि प्रशांत बनकरमध्ये काय घडलं? CDR मधील धक्कादायक माहिती उघड

Satara Doctor Death Case: महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी फलटण येथे पत्रकार परिषद घेऊन सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील महत्त्वाची माहिती दिली.

Satara Doctor Case: लक्ष्मी पूजनाला महिला डॉक्टर आणि प्रशांत बनकरमध्ये काय घडलं? CDR मधील धक्कादायक माहिती उघड
"Satara Doctor Death Case: लक्ष्मी पूजनाच्या दिवशी महिला डॉक्टर आणि प्रशांत बनकरमध्ये काय घडलं?"
NDTV Marathi

Satara Doctor Death Case: सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये रोज काही-न्-काही धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी सोमवारी (27 ऑक्टोबर) पत्रकार परिषदेत सांगितले की, आत्महत्या करणाऱ्या 28 वर्षीय सरकारी महिला डॉक्टर दिवाळी सणामध्ये आरोपी प्रशांत बनकरच्या घरी गेल्या होत्या आणि यादरम्यान दोघांमध्ये भांडण झालं, त्यानंतर त्या घरातून बाहेर पडल्या". रुपाली चाकणकर यांनी फलटण येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. 

महिला डॉक्टरच्या कॉल रेकॉर्डमध्ये काय आढळले? | Satara Woman Doctor Case Updates

रुपाली चाकणकर यांनी सांगितले की, "महिला डॉक्टर आणि दोन्ही आरोपींच्या कॉल रेकॉर्ड्सवरुन समजते की मार्च महिन्यापर्यंत त्या गोपाल बदनेच्या संपर्कात होत्या आणि त्यानंतर दोघांमध्ये काहीही संभाषण झालेले नाही".

लक्ष्मी पूजनाच्या दिवशी प्रशांत बनकर आणि महिला डॉक्टरमध्ये काय घडले? 

पुढे त्यांनी असंही म्हटलं की, "कॉल डिटेल रेकॉर्डवरुन (सीडीआर) हे देखील दिसून आले की महिला डॉक्टर प्रशांत बनकरच्याही संपर्कात होत्या. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी त्या बनकरच्या घरी गेल्या होत्या. फोटो नीट न काढल्याने दोघांमध्ये वाद झाला. यानंतर महिला डॉक्टर बनकरच्या घरातून बाहेर पडल्या. बनकरच्या वडिलांनी त्यांना समजावून घरी आणलं, पण त्या लॉजवर राहण्यास गेल्या". 

Satara Doctor Suicide Case: साताऱ्यातील महिला डॉक्टरने आत्महत्येपूर्वी पुण्यातील त्या व्यक्तीला फोन केला, तपासात मोठी माहिती समोर

(नक्की वाचा: Satara Doctor Suicide Case: साताऱ्यातील महिला डॉक्टरने आत्महत्येपूर्वी पुण्यातील त्या व्यक्तीला फोन केला, तपासात मोठी माहिती समोर)

महिला डॉक्टरांच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधील माहिती

"कठोर पाऊल उचलण्यासंदर्भात महिला डॉक्टरने बनकरला मेसेजही केला होता आणि प्राथमिक शवविच्छेदन अहवालानुसार गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झालंय",अशी माहितीही रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रकरणात अन्य कोणत्या व्यक्तीचा समावेश आहे की नाही, याबाबतही पोलीस चौकशी करत असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिलीय.

Satara Doctor Case: दोघांशीही संबंध, लॉजची रुमही स्वत: बुक केली, पोलिसांचे धक्कादायक खुलासे

(नक्की वाचा: Satara Doctor Case: दोघांशीही संबंध, लॉजची रुमही स्वत: बुक केली, पोलिसांचे धक्कादायक खुलासे)

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात दोन जणांना अटक

सॉफ्टवेअर इंजिनिअर प्रशांत बनकर आणि निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने या दोघांना सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात अटक करण्यात आलीय. गुरुवारी (23 ऑक्टोबर) रात्री फलटण येथील एका हॉटेलच्या रुममध्ये महिला डॉक्टर गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्या होत्या. त्यांनी स्वतःच्या तळहातावर लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदनेवर बलात्काराचा तर प्रशांत बनकरवर मानसिक छळ केल्याचा आरोप केला होता.

(ही बातमी एनडीटीव्ही टीमने संपादित केलेली नाही. ही बातमी सिंडीकेट फीडद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. )
Listen to the latest songs, only on JioSaavn.com