जाहिरात

Satara Doctor Suicide Case: सातारा महिला डॉक्टरची आत्महत्या की हत्या? पोस्टमार्टेम रिपोर्टमधील मोठा खुलासा

Satara Doctor Suicide Case: सातारा महिला डॉक्टरच्या पोस्टमार्टेम रिपोर्टबाबत पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली.

Satara Doctor Suicide Case: सातारा महिला डॉक्टरची आत्महत्या की हत्या? पोस्टमार्टेम रिपोर्टमधील मोठा खुलासा
"Satara Doctor Suicide Case: महिला डॉक्टराच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधील माहिती उघड"
NDTV Marathi

Satara Doctor Suicide Case: सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आलीय. निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने आणि सॉफ्टवेअर इंजिनिअर प्रशांत बनकर अशी अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावं आहेत. 

सरकारी रुग्णालयामध्ये कार्यरत असणाऱ्या 28 वर्षीय महिला डॉक्टरने कथित स्वरुपात गळफास घेऊन आत्महत्या केली. 23 ऑक्टोबर रोजी त्यांनी फलटण शहरातील एका हॉटेलच्या रुममध्ये गळफास घेऊन जीवन संपवलं. हॉटेल कर्मचाऱ्यांना त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. महिला डॉक्टरने त्यांच्या तळहातावर लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये गोपाल बदने आणि प्रशांत बनकरच्या नावाचा उल्लेख केला होता. गोपाल बदनेवर बलात्काराचा तर प्रशांतवर मानसिक छळाचा आरोप त्यांनी केलाय. दरम्यान मंगळवारी (28 ऑक्टोबर 2025) महिला डॉक्टरांच्या मृतदेहाचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आल्याची माहिती पोलिसांनी दिली.  

पोस्टमार्टेम रिपोर्टद्वारे नेमकी कोणती माहिती समोर आली? 

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, महिला डॉक्टरच्या शवविच्छेदन अहवालाद्वारे फास लागल्याने गुदमरुन मृत्यू झाल्याचे कारण समोर आले आहे. 

महिला डॉक्टरच्या मृतदेहाचे शवविच्छेदन एका अत्याधुनिक रुग्णालयात करण्यात आले आणि त्यांचे व्हिसेरा (शरीराच्या आतील अवयव) फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात येणार आहेत, अशीही माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय. 

Satara Doctor Case: मृत्यूनंतरही महिला डॉक्टरचं व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅक्टिव्ह होतं? महत्त्वाचा डेटा डिलिट? कुटुंबीयांचा गंभीर आरोप

(नक्की वाचा: Satara Doctor Case: मृत्यूनंतरही महिला डॉक्टरचं व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅक्टिव्ह होतं? महत्त्वाचा डेटा डिलिट? कुटुंबीयांचा गंभीर आरोप)

मृत्यूनंतर व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅक्टिव्ह होतं?

दरम्यान महिला डॉक्टरांच्या मृत्यूनंतर त्यांचे व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅक्टिव्ह (WhatsApp) असल्याचा गंभीर आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला. इतकंच नव्हे तर कोणीतरी त्यांचा फोन अनलॉक करण्यासाठी त्यांच्या फिंगरप्रिंटचा वापर करुन त्यातील महत्त्वपूर्ण माहिती डिलिट केली, असाही दावा कुटुंबीयांकडून करण्यात आलाय. 

Satara Doctor Case: दोघांशीही संबंध, लॉजची रुमही स्वत: बुक केली, पोलिसांचे धक्कादायक खुलासे

(नक्की वाचा: Satara Doctor Case: दोघांशीही संबंध, लॉजची रुमही स्वत: बुक केली, पोलिसांचे धक्कादायक खुलासे)

(Content Source : PTI Bhasha)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com