Satara Doctor Suicide Case: सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडालीय. आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरांच्या कुटुंबीयांनी प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. दुसरीकडे महिला डॉक्टरांच्या काकांनी असाही दावा केलाय की, "महिला डॉक्टरच्या मृत्यूनंतर कोणीतरी त्यांचा फोन अनलॉक करण्यासाठी त्यांच्या फिंगरप्रिंटचा वापर केला आणि त्यातील महत्त्वपूर्ण माहिती डिलिट केली".
महिला डॉक्टरचे व्हॉट्सअॅप कोणी वापरलं? कुटुंबीयांचा गंभीर आरोप
महिला डॉक्टराच्या कुटुंबीयांनी असाही आरोप केलाय की, "तिच्या व्हॉट्सअॅप अकाउंटच्या लास्ट सीन स्टेटसवरुन असं समजतंय की मृत्यूनंतरही सोशल मेसेजिंग अॅप अॅक्टिव्ह होते. त्यामुळे कोणीतरी अॅप वापरल्याचा संशय निर्माण होतोय".
(नक्की वाचा: Satara Doctor Suicide Case : फोटोवरून वाद, शेवटचा कॉल... डॉक्टरच्या आत्महत्येपूर्वीची धक्कादायक माहिती उघड)
आम्ही फलटणमध्ये जाणार नाही: महिला डॉक्टरांचे कुटुंबीय
मृत महिला डॉक्टरांच्या एका महिला नातेवाईकाने म्हटलं की, "मुख्यमंत्र्यांकडे आमच्या काही मागण्या आहेत. शक्य तितक्या लवकर एसआयटी स्थापन करावी. आम्ही फलटणमध्ये जबाब नोंदवण्यासाठी जाणार नाही. फास्ट ट्रॅक कोर्टात या प्रकरणाची सुनावणी झाली पाहिजे. माझ्या बहिणीवरील केल्या जाणाऱ्या आरोपांची पडताळणी करण्यासाठी सीडीआर (कॉल डिटेल रेकॉर्ड) तपासले पाहिजेत."
(नक्की वाचा: Satara Doctor Case: दोघांशीही संबंध, लॉजची रुमही स्वत: बुक केली, पोलिसांचे धक्कादायक खुलासे)
गोपाल बदनेच्या आत्मसमर्पणावरही उपस्थित केले प्रश्नचिन्ह
आणखी एका नातेवाईकाने निलंबित पोलीस उप निरीक्षक गोपाल बदनेच्या आत्मसमर्पणाबाबतही प्रश्न उपस्थित केले आहेत. या नातेवाईकाने म्हटलंय की, "पोलीस गोपाल बदनेचा शोध घेत राहिले. पोलिसांची पाच पथके स्थापन करून वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्यात आली. मग मुख्यमंत्र्यांच्या फलटण दौऱ्याच्या एक दिवस आधी आरोपीने आत्मसमर्पण कसे केले? आम्हाला वाटतंय की त्याने सर्व पुरावे नष्ट केले आणि त्यानंतर आत्मसमर्पण केले."
(नक्की वाचा: Satara Doctor Case: लक्ष्मी पूजनाला महिला डॉक्टर आणि प्रशांत बनकरमध्ये काय घडलं? CDR मधील धक्कादायक माहिती उघड)
नेमके काय आहे प्रकरण? | Satara Woman Doctor Suicide Case
सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील सरकारी रुग्णालयामध्ये कार्यरत असणाऱ्या 28 वर्षीय महिला डॉक्टराने (Satara Doctor Suicide Case) आत्महत्या केली. 23 ऑक्टोबर रोजी शहरातील एका हॉटेलच्या रुममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला होता. त्यांनी तळहातावर सुसाइड नोट लिहून निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदनेवर बलात्काराचा तर सॉफ्टवेअर इंजिनिअर प्रशांत बनकरने मानसिक छळ केल्याचा आरोप केला होता. यानंतर 25 ऑक्टोबर रोजी गोपाल बदनेनं पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले, यानंतर त्याला अटक करण्यात आली होती.
(Content Source : PTI Bhasha)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world


