जाहिरात

Satara News: सातारा हादरलं! घाणेरडा स्पर्श, मारहाण;नामांकित शाळेत 24 मुलांचा लैंगिक छळ; नराधम वॉर्डबॉयचं कृत्य

Satara News: साताऱ्यातील नामांकित शाळेत 24 मुलांचा लैंगिक छळ झाल्याची धक्कादायक घटना. नेमकं काय घडलं, वाचा सविस्तर बातमी.

Satara News: सातारा हादरलं! घाणेरडा स्पर्श, मारहाण;नामांकित शाळेत 24 मुलांचा लैंगिक छळ; नराधम वॉर्डबॉयचं कृत्य
"Satara News: नामांकित शाळेत 24 मुलांचा लैंगिक छळ"
NDTV Marathi

- राहुल तपासे, प्रतिनिधी
Satara News:
सातारा शहरातील एका अतिशय नामांकित शाळेच्या हॉस्टेलमध्ये 24 मुलांचा लैंगिक आणि मानसिक छळ झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी वॉर्डबॉय ऋषिकेश सुभाष चव्हाण याला अटक केली होती. पण न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली असल्याची माहिती सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली.

साताऱ्याच्या नामांकित शाळेत नेमकं काय घडलं?

संबंधित शाळेच्या हॉस्टेलमध्ये हा आरोपी गेल्या चार महिन्यांपासून तात्पुरत्या स्वरूपात 'केअर टेकर' म्हणून कार्यरत होता. सुरुवातीला केवळ तीन मुलांसोबत गैरप्रकार झाल्याची तक्रार समोर आली होती. पण सध्या तब्बल 24 मुलांच्या पालकांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी आल्या आहेत. 

(नक्की वाचा: Pune News: पुण्याच्या मिस इंडिया अर्थचा होमहवन करत हिंदू धर्मात प्रवेश, पती आतिफवर गंभीर आरोप; छळाची मांडली आपबिती)

पालकांचे गंभीर आरोप

मुलांच्या शरीराला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणे, मारहाण करणे, पैशांची मागणी करणे आणि धमक्या देणे अशा प्रकारचे कृत्य आरोपी करत असल्याचे तपासात समोर आले आहे. अनेक पालकांनी एकत्र येत या नराधमाविरोधात तक्रारी नोंदवल्या आहेत.

आरोपीविरोधात पोलीस कारवाई

या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ 'पॉक्सो' (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली होती. "एकूण 24 मुलांच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्या दृष्टीने तपास सुरू आहे," असे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी स्पष्ट केले. दरम्यान आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com