
Rajasthan Barmer Suicide News: राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यातून सामूहिक आत्महत्येची एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. प्रॉपर्टीच्या वादामुळे त्रस्त झालेल्या एका दाम्पत्याने आपल्या दोन लहान मुलांसह पाण्याच्या टाकीत उडी घेऊन आत्महत्या केली. बाडमेर जिल्ह्यातील शिव पोलीस स्टेशन हद्दीतील उंडू गावात ही घटना घडली. पोलिसांनी घटनास्थळावरून एक सुसाइड नोट जप्त केली आहे. त्यामध्ये आत्महत्येमागील कारण नमूद केले आहे. मृतांमध्ये शिवलाल (35), त्याची पत्नी कविता (32), आणि त्यांचे दोन मुलगे बजरंग (9) आणि रामदेव (8) यांचा समावेश आहे. चौघांचे मृतदेह घरापासून 20 मीटर दूर असलेल्या पाण्याच्या टाकीत आढळले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या भीषण घटनेपूर्वी आई कविताने धाकटा मुलगा रामदेवला मुलीसारखे सजवले होते. त्याला ओढणी नेसविली होती. डोळ्यात काजळ घातले होते. स्वतःचे सोन्याचे दागिनेही घातले होते. निरागस रामदेव खूप आनंदी होता. आत्महत्ये आधी त्याचा व्हिडिओही बनवण्यात आला होता. त्या चिमुकल्याला काय माहीत होते की काही वेळातच त्याचा मृत्यू होणार आहे. या घटनेनंतर काही वेळातच चौघांनी पाण्याच्या टाकीत उडी घेऊन आपला जीव दिला.
ट्रेंडिंग बातमी - MNS News: 'मराठीचा आदर केला नाही तर फटके पडणारच', मीरारोडचा वाद चिघळणार?
सुसाइड नोटमध्ये काय लिहिले आहे?
पोलिसांना घटनास्थळावरून मिळालेल्या सुसाइड नोटमध्ये, लहान भावासह तीन लोकांना या मृत्यूसाठी जबाबदार धरले आहे. सुसाइड नोटमध्ये घर आणि जमिनीवरून दीर्घकाळापासून सुरू असलेल्या वादाचा उल्लेख आहे. "आमचे अंत्यसंस्कार घरासमोरच केले जावेत. शिवाय आमच्या मृत्यूला हेच लोक जबाबदार आहेत असं यात लिहिले आहेत. पोलिस आणि फॉरेन्सिक टीमने (FSL) घटनास्थळावरून आवश्यक पुरावे गोळा केले आहेत. मृतांच्या कुटुंबीयांनी शिवलालच्या धाकट्या भावावर मानसिक छळ आणि सतत वादामध्ये गुंतवल्याचा आरोप केला आहे. पोलिस आता सुसाइड नोटमध्ये लिहील्यानुसार संबधित लोकांची चौकशी करत आहेत.
ट्रेंडिंग बातमी - ड्रग्ज प्रकरणात सापडल्यास थेट मकोका लागणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
कौटुंबिक मालमत्ता वाद नेमका काय होता?
शिवलाल जयपूरमध्ये हस्तकलेचे काम करत होता. तर त्याचा धाकटा भाऊ मांगीलाल बाडमेरमध्ये मंडप सजावटीचे काम करत होता. वडील पूजापाठ करत होते. गावात शिवलाल आणि मांगीलालच्या आईच्या, म्हणजेच कमलाच्या, नावावर वडिलोपार्जित घर होते. नुकतेच आईच्या नावावर सरकारी घरही मंजूर झाले होते. शिवलालला वाटत होते की वडिलोपार्जित घर धाकट्या भावाला द्यावे आणि आईच्या नावावर मंजूर झालेले सरकारी घर त्याला मिळावे. मात्र, आई आणि भाऊ मांगीलालला हे मान्य नव्हते. आई धाकट्या भावाच्या बाजूने जास्त होती. तर वडील नागराराम दोन्ही भावांना समान वागणूक देत होते. या कौटुंबिक वादामुळे शिवलालने आपली पत्नी आणि दोन मुलांसह आत्महत्या केली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world