जाहिरात

Sindhudurg Crime News : 'तुम्ही आमदार होता, 2 वर्ष काय केलं?' निलेश राणेंचा वैभव नाईकांना प्रश्न

Sindhudurg Crime News : सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर हत्या प्रकरणामुळे (Prakash Bidwalkar Murder Case) कोकणातील राजकारण तापलं आहे.

Sindhudurg Crime News : 'तुम्ही आमदार होता, 2 वर्ष काय केलं?'  निलेश राणेंचा वैभव नाईकांना प्रश्न
मुंबई:

Sindhudurg Crime News : सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर हत्या प्रकरणामुळे (Prakash Bidwalkar Murder Case) कोकणातील राजकारण तापलं आहे. या प्रकरणात संशयाची सुई शिवसेना आमदार निलेश राणेंवर (Nilesh Rane) रोखण्यात आली होती. राणेंचे कट्टर विरोधक आणि माजी आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी आरोप केला होता. नाईक यांच्या आरोपांना निलेश राणेंनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलं.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

वैभव नाईक यांना हे प्रकरण माहिती होतं तर त्यांनी ते का लपवलं? 2 वर्षांपूर्वी केस रजिस्टर का केली नाही? नाईक त्यावेळी आमदार होते. ते सरकार जाण्याची वाट पाहात होते का? असे प्रश्न राणे यांनी या पत्रकार परिषदेत विचारले. नाईकांनी हा व्हिडिओ पोलिसांना न देता सोशल मीडियावर टाकला. त्यावर पोलिसांनी वैभव नाईक यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी देखील राणे यांनी यावेळी केली. 

काय आहे प्रकरण?

सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर या तरुणाचं मार्च 2023 मध्ये अपहरण करण्यात आलं होतं. त्यावेळी त्याला विविस्त्र करुन बेदम मारहाण करण्यात आले. या मारहाणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी व्हायरल झाले. 

( नक्की वाचा : Tanisha Bhise Case : दीनानाथ मंगेशकर नाही तर 'या' दोन हॉस्पिटलवर ससूनच्या अहवालात ठपका )
 

या अपहरणानंतर गायब असलेल्या बिडवलकरची हत्या झाल्याचा उलगडा काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या एका निनावी फोनच्या माध्यमातून करण्यात आला. या हत्येमध्ये हत्येमध्ये  सिद्धेश शिरसाट, गणेश नार्वेकर, सर्वेश केरकर आणि अमोल शिरसाट, यांचा समावेश आहे. . पण त्यातल्या सिद्धेश शिरसाटचा दाखला देत, वैभव नाईक यांनी या हत्येमागे शिंदे गटातल्या एका नेत्याचं कनेक्शन असल्याचा आरोप केला. नाईकांनी हा इशारा निलेश राणेंकडे केला होता.  

निलेश राणे यांनी त्यावर पत्रकार परिषदेत हे आरोप फेटाळाले. तसंच वैभव नाईक यांच्यावर आरोप केले आहेत. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: