गुरु दळवी, सिंधुदुर्ग:
Malvan Nagar Parishad Election Result 2025: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल हाती येत आहेत. अनेक ठिकाणी महायुतीमध्येच मोठी चुरस पाहायला मिळत असून भाजप- शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरु आहे. कोकणामध्ये राणे बंधुंच्या संघर्षामुळे लक्ष वेधलेल्या मालवण नगर परिषदेचा निकाल आता समोर आला आहे. या निवडणुकीत निलेश राणेंनी मंत्री नितेश राणेंना जोर का झटका दिला आहे.
निलेश राणेंचा मंत्री नितेश राणेंना धक्का!
संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या मालवण नगर परिषद निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मुसंडी मारली आहे. नगराध्यक्षपदाच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या लढतीत शिवसेनेच्या ममता वराडकर यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा १०१९ मतांच्या फरकाने पराभव करत विजय संपादन केला. या विजयामुळे मालवण नगर परिषदेवर आता शिवसेनेचा भगवा डौलाने फडकला आहे.
Maval Election Result: एका मताने निकाल फिरला, अजित पवारांचा शिलेदार जिंकला, राज्यातील पहिला विजय!
मालवणच्या या निवडणुकीत राणे विरुद्ध राणे असा संघर्ष पाहायला मिळाला. शिवसेनेचे आमदार नीलेश राणे आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यातील प्रतिष्ठेच्या लढाईत अखेर नीलेश राणे यांचे सूक्ष्म नियोजन सरस ठरल्याचे दिसून येत आहे. नीलेश राणे यांनी आखलेली रणनीती आणि कार्यकर्त्यांची बांधणी यामुळे भाजपच्या आव्हानाला रोखण्यात शिवसेनेला यश आले.
नगर परिषदेच्या एकूण २० जागांपैकी शिवसेनेने १० जागांवर विजय मिळवला असून, नगराध्यक्षपदावरही कब्जा मिळवला आहे. कोकणातील राजकारणात मालवण नगर परिषदेला विशेष महत्त्व आहे. या निकालामुळे शिंदे यांच्या शिवसेनेने कोकणात आपली पकड अधिक मजबूत असल्याचे सिद्ध केले आहे. पराभूत भाजप उमेदवारासाठी हा निकाल मोठा धक्का मानला जात असून, आगामी काळात येथील राजकीय समीकरणे अधिक रंजक होण्याची चिन्हे आहेत.
कणकवलीमध्ये नितेश राणेंना धक्का
मालवणात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला तर कणकवलीत शहर विकास आघाडीचे संदेश पारकर जिंकलेत. विजयी नगरसेवकांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास भाजपचे 41 नगरसेवक विजयी झालेत. शिंदेंच्या शिवसेनेचे 18 नगरसेवक जिंकले आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे 8 नगरसेवक विजयी झालेत तर शहर विकास आघाडीचे 8 नगरसेवक जिंकले आहेत. सिंधुदुर्गातून काँग्रेसचा 1 नगरसेवक विजयी झाला आहे.
Mahad Election Result: भरत गोगावलेंनी गड राखला, महाडमध्ये सुनील तटकरेंना धक्का, वाचा निकाल
कुठे कोण जिंकलं?
- वेंगुर्ला: नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप (भाजप)
- भाजप 16
- शिंदे सेना 1
- ठाकरे सेना 3
- सावंतवाडी: नगराध्यक्ष श्रद्धाराजे भोसले (भाजप)
- भाजप 11
- शिंदे शवसेना 7
- ठाकरे सेना 1
- कांग्रेस 1
- मालवण: नगराध्यक्ष ममता वराडकर (शिंदे सेना)
- भाजप 5
- शिंदे सेना 10
- ठाकरे सेना 4
- अपक्ष 1
- कणकवली: नगराध्यक्ष, संदेश पारकर (शहर विकास आघाडी)
- भाजप 9
- शहर विकास आघाडी 8
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world